Ashok Kharat Case : अशोक खरात प्रकरणी शितल म्हात्रेंच्या ‘त्या’ गंभीर आरोपाला सुषमा अंधारे यांचे प्रत्युत्तर; काय आहे नेमका वाद?

शितल म्हात्रे यांच्या या आरोपांवर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी जोरदार टीका केली आहे. म्हात्रे यांची ही धडपड 'केविलवाणी' असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Ashok Kharat Case : अशोक खरात प्रकरणी शितल म्हात्रेंच्या ‘त्या’ गंभीर आरोपाला सुषमा अंधारे यांचे प्रत्युत्तर; काय आहे नेमका वाद?

Sushma Andhare Reply on Sheetal Mhatre Allegations : अशोक खरात प्रकरणाने सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणावरून शिवसेना (शिंदे गट) आणि शिवसेना (ठाकरे गट) यांच्यातील कलगीतुरा अधिकच रंगला असून, दोन्ही बाजूंनी एकमेकांवर गंभीर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. शितल म्हात्रे यांनी या प्रकरणात थेट ‘मातोश्री’ला खेचल्याने या वादाला आता नवीन वळण मिळाले आहे.

शितल म्हात्रे यांचा ‘मातोश्री’वर थेट निशाणा
शिवसेनेच्या नेत्या शितल म्हात्रे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून एक खळबळजनक दावा केला आहे. त्यांच्या मते, अशोक खरात याच्या संस्थेला मिळालेली पाण्याची जोडणी ही ‘मातोश्री’वरून आलेल्या आग्रहाखातर देण्यात आली होती. “क्रूरकर्मा खरातला दिलेली पाण्याची जोडणी ही मातोश्रीच्या मॅडमच्या आग्रहाखातर देण्यात आली होती, असे ऐकिवात आहे,” असे ट्विट म्हात्रे यांनी केले आहे. जर या प्रकरणातील ‘ताज का राज’ बाहेर आला, तर अनेकांच्या तोंडचे पाणी पळेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. खरातच्या संस्थेला मिळालेल्या शासकीय सुविधांमागे कोणाचे वरदहस्त होते, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

सुषमा अंधारे यांचे सडेतोड प्रत्युत्तर
शितल म्हात्रे यांच्या या आरोपांवर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी जोरदार टीका केली आहे. म्हात्रे यांची ही धडपड ‘केविलवाणी’ असल्याचे त्यांनी म्हटले आहे. अंधारे यांच्या मते विधान परिषदेच्या आगामी जागा मिळवण्यासाठी शिंदे गटातील नेत्यांमध्ये ‘कोण मोठा भाट’ अशी स्पर्धा सुरू आहे. नीलम गोऱ्हे आणि शितल म्हात्रे या दोघीही स्वतःचे राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी असे आरोप करत आहेत. तसेच, हे प्रकरण केवळ लैंगिक शोषणापुरते मर्यादित नसून त्याचे आर्थिक धागेदोरे खूप खोलवर आहेत. यामध्ये महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यासह इतर मंत्र्यांचीही चौकशी व्हावी, अशी मागणी अंधारे यांनी केली आहे. याशिवाय, अंधारे यांनी थेट दीपक केसरकर आणि तटकरे यांच्या नावांचा उल्लेख करत, त्यांचे खरातसोबत काही आर्थिक संबंध आहेत का, याची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

हेही वाचा – Sheetal Mhatre Tweet : खरात प्रकरणात शिंदे सेनेच्या शितल म्हात्रे संतापल्या, संस्थेला पाणीपुरवठा करण्यावरून ओढले ताशेरे, म्हणाल्या, ‘पाण्याची जोडणी ही मातोश्री च्या मॅडमच्या आग्रहाखातर…’

प्रकरणाची व्याप्ती आणि राजकीय कनेक्शन्स
अशोक खरात प्रकरण आता केवळ एका व्यक्तीपुरते मर्यादित राहिलेले नाही. यात अनेक राजकीय नेत्यांची नावे आणि कनेक्शन्स समोर येत आहेत. सुषमा अंधारे यांनी आरोप केला आहे की, शिंदे गटातील अनेक मंत्री ‘भोंदूगिरी’ आणि ‘तंत्र-मंत्रा’मध्ये अडकलेले आहेत. या प्रकरणातील ‘लायझनिंग’ (Liaisoning) कशा पद्धतीने झाले आणि त्यामागे कोणाचे हितसंबंध होते, यावर सविस्तर चर्चा होणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. म्हात्रे यांनी दुसऱ्यांकडे बोट दाखवण्यापूर्वी स्वतःच्या पक्षातील मंत्र्यांच्या वागणुकीकडे बघावे, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात नवा पेच
या सर्व घडामोडींमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवा पेच निर्माण झाला आहे. एकीकडे सत्तेत असलेले नेते जुन्या सरकारच्या काळातील निर्णयांवर बोट ठेवत आहेत, तर दुसरीकडे विरोधी पक्ष सध्याच्या सत्ताधाऱ्यांवर भ्रष्टाचार आणि गैरकृत्यांचे आरोप करत हल्ले करत आहेत. अशोक खरातला नक्की कोणी आणि का वाचवले, हे शोधणे आता तपास यंत्रणांसमोर मोठे आव्हान असणार आहे.

हेही वाचा – Priyanka Chaturvedi: ‘मातोश्री’वर खडाजंगी! उद्धव ठाकरेंच्या बैठकीत प्रियांका चतुर्वेदींचा संताप; संजय राऊतांवरून थेट पक्षप्रमुखांनाच सवाल

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number