Suryakumar Yadav: सूर्यकुमार यादवच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला 5 वर्षे पूर्ण; सोशल मीडियावर भावुक व्हिडीओ शेअर करत व्यक्त केली कृतज्ञता

सूर्यकुमार यादव याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्या प्रवासाचा 5 वर्षांचा टप्पा यशस्वीपणे पूर्ण केला आहे. या निमित्ताने त्याने सोशल मीडियावर एक विशेष आणि भावुक व्हिडिओ शेअर केला आहे.

Suryakumar Yadav: सूर्यकुमार यादवच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला 5 वर्षे पूर्ण; सोशल मीडियावर भावुक व्हिडीओ शेअर करत व्यक्त केली कृतज्ञता

Suryakumar Yadav: भारतीय टी-20 संघाचा यशस्वी कर्णधार सूर्यकुमार यादव याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्या प्रवासाचा 5 वर्षांचा टप्पा यशस्वीपणे पूर्ण केला आहे. या निमित्ताने त्याने सोशल मीडियावर एक विशेष आणि भावुक व्हिडिओ शेअर केला असून, तो सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. 2026 च्या टी-20 विश्वचषकात भारताला ऐतिहासिक विजेतेपद मिळवून दिल्यानंतर सूर्या सध्या विश्रांतीवर आहे. मात्र, 14 मार्च हा दिवस त्याच्यासाठी अत्यंत खास ठरला, कारण याच दिवशी पाच वर्षांपूर्वी त्याचे टीम इंडियाकडून खेळण्याचे स्वप्न पूर्ण झाले होते.

“पाच वर्षांपूर्वी एक स्वप्न सत्यात उतरले”
सूर्यकुमारने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये आपल्या कारकिर्दीतील चढ-उतारांवर प्रकाश टाकला आहे. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, “पाच वर्षांपूर्वी एक स्वप्न सत्यात उतरले. भारताची जर्सी परिधान करणे ही अशी एक भावना आहे, जी आजही मी शब्दांत पूर्णपणे मांडू शकत नाही.” या संघाने भविष्यात आणखी अनेक अविस्मरणीय क्षण निर्माण करावेत, अशी आशाही त्याने व्यक्त केली. सूर्याच्या नेतृत्वाखाली भारताने तिसरा टी-20 विश्वचषक जिंकून नवा इतिहास रचला असून, लवकरच तो IPL 2026 च्या तयारीसाठी मैदानात परतणार आहे.

मैदानातील दमदार कामगिरी आणि कर्णधारपदाचा दबदबा
आंतरराष्ट्रीय स्तरावर पदार्पण केल्यापासून सूर्यकुमारने तिन्ही फॉरमॅटमध्ये आपली छाप पाडली आहे. त्याने आतापर्यंत एकूण 37 एकदिवसीय (ODIs) सामन्यांत 773 धावा, तर 113 टी-20 आंतरराष्ट्रीय (T20Is) सामन्यांत 3,272 धावा कुटल्या आहेत. त्याने एक कसोटी सामनाही खेळला आहे. विशेष म्हणजे, कर्णधार म्हणून त्याची आकडेवारी थक्क करणारी आहे. त्याने 52 टी-20 सामन्यांत भारताचे नेतृत्व केले असून, त्यापैकी 40 सामन्यांत विजय मिळवला आहे. 76.94 टक्के इतकी जबरदस्त विजयाची टक्केवारी असलेला तो भारताचा यशस्वी कर्णधार ठरला आहे.

हेही वाचा – Salman Agha Run Out: क्रिकेट मैदानावर घडला अजब प्रकार! सलमान चेंडू उचलायला वाकला अन्…; अनोख्या रनआउटनंतर पाकिस्तानची फजिती 

चाहत्यांप्रती कृतज्ञता
टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर बीसीसीआयने (BCCI) शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये सूर्याने चाहत्यांचे मनापासून आभार मानले. तो म्हणाला, “हा विजय केवळ आमचा नाही, तर ज्या मुलांनी सामने पाहण्यासाठी रात्रभर जागून काढली, त्या सर्वांचे हे स्वप्न होते. तुमच्या आशीर्वादांमुळेच हा चषक आज भारतात आला आहे.” सूर्याच्या या नम्र स्वभावाचे आणि मैदानातील त्याच्या ‘मिस्टर 360’ फलंदाजीचे जगभरात कौतुक होत आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number