Sunetra Pawar : सुनेत्रा पवार यांच्याकडून अजितदादांच्या आठवणींना उजाळा; म्हणाल्या, ‘अजितदादांची इच्छा होती की…’

कारखान्याच्या प्रगतीमध्ये सभासद, अधिकारी आणि कामगारांचा वाटा मोठा असल्याचे सांगत सुनेत्रा पवार यांनी सर्वांना एकत्र येण्याचे आवाहन केले.

Sunetra Pawar : सुनेत्रा पवार यांच्याकडून अजितदादांच्या आठवणींना उजाळा; म्हणाल्या, ‘अजितदादांची इच्छा होती की…’

Sunetra Pawar: अजितदादा पवार यांनी माळेगाव सहकारी साखर कारखान्याला देशातील एक मॉडेल आणि अग्रगण्य कारखाना बनवण्याचे स्वप्न पाहिले होते. त्यांच्या या स्वप्नपूर्तीसाठी आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी आपण कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन सुनेत्रा पवार यांनी आज केले. माळेगाव कारखान्याच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी सभासद, कामगार आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला.

अजितदादांची निष्ठा आणि सूक्ष्म नियोजनाचा वारसा
सुनेत्रा पवार पुढे म्हणाल्या की, “आदरणीय दादांकडे उपमुख्यमंत्री किंवा इतर महत्त्वाची पदे असतानाही त्यांनी माळेगाव कारखान्याच्या जबाबदारीकडे कधीही दुर्लक्ष केले नाही. त्यांची कामाप्रती असलेली निष्ठा आणि प्रत्येक गोष्टीवर असणारे बारीक लक्ष यामुळेच हा कारखाना आज अत्यंत चांगल्या स्थितीत आहे. दादांच्या अनुपस्थितीत तुम्ही सर्वांनी जी मोठी जबाबदारी आणि जागा मला दिली आहे, त्याबद्दल मी सर्वांची ऋणी आहे.”

शेतकरी आणि कामगारांच्या सहकार्याची हाक
कारखान्याच्या प्रगतीमध्ये सभासद, अधिकारी आणि कामगारांचा वाटा मोठा असल्याचे सांगत त्यांनी सर्वांना एकत्र येण्याचे आवाहन केले. “दादांनी या कारखान्यासाठी जे जे ठरवले आहे, ते पूर्ण करण्यासाठी मला तुमच्या सहकार्याची खात्री आहे. माळेगाव कारखाना केवळ राज्यातच नव्हे, तर देशात एक नंबरचा ठरवा, हीच दादांची इच्छा होती आणि ती पूर्ण करण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करेन,” असा शब्द त्यांनी यावेळी दिला.

हेही वाचा – Sunetra Pawar: माळेगाव साखर कारखान्यात नाट्यमय घडामोडी; चेअरमन निवड लांबणीवर पडली असली तरी सुनेत्रा पवारांचा मार्ग मोकळा?

सभासदांच्या आवाहनाला प्रतिसाद
माळेगावच्या सभासदांनी दिलेल्या प्रेमाबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना सुनेत्रा पवार म्हणाल्या की, “तुम्ही मला कधीही हाक द्या, मी तुमच्यासाठी नेहमी उपलब्ध असेन. आपण सर्वांच्या साथीने आणि सरकारच्या सहकार्याने दादांनी पाहिलेले स्वप्न नक्कीच सत्यात उतरवू.” या कार्यक्रमाला कारखान्याचे संचालक, स्थानिक नेते आणि मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number