Sunetra Pawar Meet PM Modi: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची दिल्लीवारी, पंतप्रधान मोदी अन् अमित शाह यांची घेतली भेट; कोणत्या विषयावर झाली चर्चा?

मंगळवारी रात्री दिल्लीत दाखल झाल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी बुधवारी सकाळी प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत रणनीती आखली.

Sunetra Pawar Meet PM Modi: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची दिल्लीवारी, पंतप्रधान मोदी अन् अमित शाह यांची घेतली भेट; कोणत्या विषयावर झाली चर्चा?

Sunetra Pawar Meet PM Modi: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज राजधानी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याची जबाबदारी स्वीकारलेल्या सुनेत्रा पवार यांचा हा पहिलाच दिल्ली दौरा असून, या उच्चस्तरीय बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या भवितव्याबाबत अत्यंत महत्त्वपूर्ण चर्चा झाल्याचे समजते. या दौऱ्यामुळे राज्याच्या राजकारणाला नवी दिशा मिळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

मोदी-शाह यांच्यासोबत ‘मिशन दिल्ली’; विलीनीकरणाची चर्चा?
मंगळवारी रात्री दिल्लीत दाखल झाल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी बुधवारी सकाळी प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत रणनीती आखली. त्यानंतर पार्थ पवार, जय पवार आणि खासदार सुनील तटकरे यांच्यासह त्यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली. सुमारे 40 मिनिटे चाललेल्या या बैठकीत राज्यातील सद्य राजकीय स्थितीवर सविस्तर चर्चा झाली. त्यानंतर अमित शाह यांच्यासोबत झालेल्या अर्ध्या तासाच्या बैठकीत प्रामुख्याने ‘राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणावर’ चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे.  

मंत्रालयात स्वीकारला कार्यभार 
दिल्ली दौऱ्यापूर्वी सुनेत्रा पवार यांनी मंगळवारी मंत्रालयातील आपल्या दालनाचा कार्यभार स्वीकारला. सहाव्या मजल्यावरील उपमुख्यमंत्र्यांच्या दालनात प्रवेश करताना वातावरण अत्यंत भावूक झाले होते. दालनात अजित पवारांची प्रतिमा पाहताच सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांना अश्रू अनावर झाले. उपमुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसण्यापूर्वी सुनेत्रा पवारांनी त्या खुर्चीला सन्मानाने वाकून अभिवादन केले. “अजितदादांनी घेतलेला विकासाचा ध्यास हाच माझा मार्गदर्शक दीपस्तंभ असेल,” अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

हेही वाचा – Ajit Pawar Death Mystery: ‘अजितदादांच्या मृतदेहावर सूज अन्…’; डॉक्टरांच्या हवाल्याने रोहित पवारांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट

फडणवीसांच्या दौऱ्यानंतर वेगवान हालचाली; महायुतीचा नवा आराखडा
विशेष म्हणजे, सोमवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही दिल्लीत येऊन भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाची भेट घेतली होती. त्यानंतर अवघ्या 24 तासांत सुनेत्रा पवार दिल्लीत दाखल झाल्याने, महायुतीमधील आगामी जागावाटप आणि राष्ट्रवादीच्या नव्या स्वरूपाबाबत दिल्लीत अंतिम निर्णय झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सुनेत्रा पवारांच्या या दौऱ्याने राष्ट्रवादीच्या पुढील प्रवासाचे संकेत दिले असून, लवकरच मोठ्या राजकीय घोषणा होण्याची चिन्हे आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number