Baramati Bypoll 2026: बारामतीत सुनेत्रा पवारांना तगडे आव्हान; काँग्रेसकडून ‘या’ 5 नावांतून एकावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता

राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनेत्रा पवार यांच्या विरोधात काँग्रेसने आपला तगडा उमेदवार रिंगणात उतरवण्याची पूर्ण तयारी केली आहे.

Baramati Bypoll 2026: बारामतीत सुनेत्रा पवारांना तगडे आव्हान; काँग्रेसकडून ‘या’ 5 नावांतून एकावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता

Baramati Bypoll 2026: दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीने आता एक वेगळे वळण घेतले आहे. ही निवडणूक बिनविरोध होईल, अशा चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनेत्रा पवार यांच्या विरोधात काँग्रेसने आपला तगडा उमेदवार रिंगणात उतरवण्याची पूर्ण तयारी केली आहे. 5 एप्रिल 2026 रोजी प्राप्त झालेल्या ताज्या माहितीनुसार, काँग्रेसकडून आकाश मोरे यांच्या नावावर उमेदवारीसाठी अंतिम शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.

महाविकास आघाडीतील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर
बारामती पोटनिवडणुकीच्या निमित्ताने महाविकास आघाडीतील घटक पक्षांमधील मतभेद आता उघड झाले आहेत. आघाडीचा भाग असूनही शरद पवार गट आणि शिवसेना (ठाकरे गट) यांनी सुनेत्रा पवार यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे. मात्र, काँग्रेस पक्ष सुरुवातीपासूनच ही निवडणूक लढवण्याच्या निर्णयावर ठाम राहिला आहे. यामुळे ही लढत 'मैत्रीपूर्ण' असेल की थेट राजकीय आव्हान, याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

काँग्रेसची रणनीती: 'धनगर' कार्ड आणि उमेदवारी
सुनेत्रा पवार यांना तगडी फाईट देण्यासाठी काँग्रेसने पाच नावांची सखोल चाचपणी केली होती. यामध्ये अर्चना पाटील, वैभव बुरुंगले, रोहित बनकर आणि डॉ. विजयकुमार पिसे यांचा समावेश होता. मात्र, अखेर आकाश मोरे यांच्या रूपाने काँग्रेसने बारामतीमध्ये 'धनगर' कार्ड खेळण्याचे संकेत दिले आहेत. या मतदारसंघातील धनगर समाजाची निर्णायक मते लक्षात घेऊनच मोरे यांना पसंती दिली जात असल्याची चर्चा आहे. दिल्लीतून अधिकृत घोषणा होताच प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज भरला जाणार आहे.

निवडणुकीचे वेळापत्रक आणि रिंगणातील उमेदवार
या पोटनिवडणुकीसाठी प्रशासकीय तयारी पूर्ण झाली असून, मतदानाची प्रक्रिया 23 एप्रिल 2026 रोजी पार पडणार आहे, तर या लढतीचा निकाल 4 मे 2026 रोजी जाहीर होईल. आतापर्यंत या निवडणुकीसाठी एकूण 19 जणांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये राजकीय पक्षांच्या उमेदवारांसह चर्चेत असलेले अभिजीत बिचुकले यांच्यासारख्या अपक्षांचाही मोठा भरणा आहे.

हेही वाचा – Anjali Damania on Sushma Andhare : सुषमा अंधारेंच्या प्रश्नाला अंजली दमानियांचं सडेतोड उत्तर, म्हणाल्या, 'फक्त माझ्या विरुद्ध बोलायला…'

प्रमुख दावेदार आणि राजकीय आखाडा
बारामतीचा हा राजकीय आखाडा आता केवळ सुनेत्रा पवार (राष्ट्रवादी काँग्रेस) आणि आकाश मोरे (काँग्रेस) यांच्यापुरता मर्यादित राहिलेला नाही. या शर्यतीत सतिश कदम (हिंदुस्तान जनता पार्टी) आणि राघू घटुकडे (न्यू राष्ट्रीय समाज पार्टी) यांसारख्या उमेदवारांनीही शड्डू ठोकला आहे. अनेक अपक्ष उमेदवारांच्या सहभागामुळे या पोटनिवडणुकीतील चुरस अधिकच वाढली असून, बारामतीकर कोणाच्या पारड्यात आपले मत टाकतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number