Makar Sankranti 2026 : सूर्यदेवाचा मकर राशीप्रवेश; 2026 मध्ये कोणत्या राशींचे नशीब फळफळणार आणि कोणाला राहावे लागेल सावध?

सूर्य संक्रमणामुळे काही ठराविक राशींच्या आयुष्यात प्रगतीचे नवे दरवाजे उघडणार आहेत. तर, काही राशींना प्रत्येक पाऊल विचारपूर्वक टाकवे लागणार आहे.

Makar Sankranti 2026 : सूर्यदेवाचा मकर राशीप्रवेश; 2026 मध्ये कोणत्या राशींचे नशीब फळफळणार आणि कोणाला राहावे लागेल सावध?

Makar Sankranti 2026 : ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून 2026 या नवीन वर्षाची सुरुवात अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जात आहे. 14 जानेवारी 2026 रोजी सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करणार असून, या दिवसाला आपण 'मकर संक्रांत' म्हणून साजरी करतो. मकर राशी ही शनिदेवाची राशी असल्याने सूर्याचे हे संक्रमण कर्म, शिस्त आणि जबाबदारीचे प्रतीक मानले जाते. या ग्रहांच्या बदलाचा प्रभाव सर्व 12 राशींवर पडणार असून, काहींसाठी हे वर्ष सुवर्णसंधी घेऊन येईल, तर काहींना आव्हानांचा सामना करावा लागू शकतो.

भाग्यवान राशी: करिअर आणि पदप्रतिष्ठेत वाढ
सूर्य संक्रमणामुळे काही ठराविक राशींच्या आयुष्यात प्रगतीचे नवे दरवाजे उघडणार आहेत. यात प्रामुख्याने खालील राशींचा समावेश होतो:
मकर: स्वतःच्या राशीत सूर्य येत असल्याने आत्मविश्वास द्विगुणित होईल. समाजात मान-सन्मान वाढेल आणि प्रलंबित कामे पूर्ण होतील.
मेष: नोकरीत बढती (Promotion) मिळण्याचे योग आहेत. जे लोक नवीन स्टार्टअप किंवा व्यवसाय सुरू करू इच्छितात, त्यांच्यासाठी हा काळ उत्तम आहे.
सिंह: नेतृत्वगुण सिद्ध करण्याची संधी मिळेल. सरकारी कामात यश मिळण्याची शक्यता आहे.
मिथुन: शिक्षण, मीडिया आणि डिजिटल क्षेत्रात काम करणाऱ्यांना मोठा आर्थिक लाभ होऊ शकतो.

हेही वाचा – Makar Sankranti 2026: 14 की 15 जानेवारी कधी आहे मकर संक्रांत? जाणून घ्या संक्रांतीची तिथी, शुभ मुहूर्त आणि धार्मिक महत्व

आर्थिक नियोजन आणि सावधगिरी
संक्रांतीनंतर लक्ष्मीची कृपा कोणावर असेल, याचे संकेतही ग्रहांच्या स्थितीवरून मिळतात. मकर आणि सिंह राशीच्या व्यक्तींना आर्थिक स्थैर्य लाभेल, मात्र गुंतवणुकीच्या बाबतीत काही राशींना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. कर्क, वृश्चिक आणि मीन राशीच्या लोकांनी शेअर बाजार किंवा मोठ्या व्यवहारांत पैसे गुंतवताना तज्ज्ञांचा सल्ला घेणे हिताचे ठरेल. विनाकारण होणारे खर्च आणि आर्थिक फसवणूक टाळण्यासाठी या काळात नियोजनबद्ध पावले उचलणे आवश्यक आहे.

'या' राशींवर संकटाची छाया?
ग्रहमानानुसार कर्क, वृश्चिक, कुंभ आणि मीन या राशींना संक्रांतीनंतर थोडे सावध राहावे लागेल. कर्क राशीच्या व्यक्तींना घरगुती तणाव किंवा मानसिक अस्थिरतेचा सामना करावा लागू शकतो. वृश्चिक राशीच्या जातकांना कामाच्या ठिकाणी 'ऑफिस पॉलिटिक्स'चा त्रास होण्याची शक्यता आहे. कुंभ आणि मीन राशींनी आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे, विशेषतः मानसिक ताणतणावापासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा.

शुभ फलांसाठी ज्योतिषीय उपाय
संक्रांतीच्या काळात सूर्यदेवाची कृपा मिळवण्यासाठी काही विशेष उपाय करणे फायदेशीर ठरते. 14 जानेवारी रोजी सकाळी सूर्याला अर्घ्य अर्पण करावे. तसेच तिळाचे दान करणे आणि गरजू व्यक्तींना अन्नदान करणे शास्त्रानुसार शुभ मानले जाते. नवीन वर्षात मोठे निर्णय घेताना घाई न करता संयम बाळगल्यास ग्रहांचे नकारात्मक परिणाम कमी होऊ शकतात.

हेही वाचा – Makar Sankranti 2026 : शुभ कार्यांत वर्ज्य असलेला हा रंग मकर संक्रांतीलाच का ठरतो विशेष? जाणून घ्या, महत्त्व

(Disclaimer : ही बातमी सामान्य ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. यातून जय महाराष्ट्र कोणताही दावा करत नाही किंवा हमी देत नाही.)

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number