Ashok Kharat Case: ‘बदनामी थांबवा, अन्यथा कोर्टात खेचणार…’; खरातशी कनेक्शनच्या व्हायरल पत्रावर राष्ट्रवादी जिल्हाध्यक्षांचा संताप

या पत्राने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली असून, या गंभीर आरोपांवर प्रज्ञा खोसरे यांनी कडक शब्दांत आपली प्रतिक्रिया दिली आहे.<br/>

Ashok Kharat Case: ‘बदनामी थांबवा, अन्यथा कोर्टात खेचणार…’; खरातशी कनेक्शनच्या व्हायरल पत्रावर राष्ट्रवादी जिल्हाध्यक्षांचा संताप

Ashok Kharat Case: नाशिकमधील बहुचर्चित भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात आता राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बीड जिल्हाध्यक्षा प्रज्ञा खोसरे या खरातच्या हस्तक असून त्यांच्यामुळे सुनेत्रा पवार यांच्या जिवाला आणि प्रतिष्ठेला धोका आहे, असे खळबळजनक दावे असलेले एक निनावी पत्र समाज माध्यमांवर व्हायरल झाले आहे. या पत्राने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली असून, या गंभीर आरोपांवर प्रज्ञा खोसरे यांनी कडक शब्दांत आपली प्रतिक्रिया दिली आहे.

“आम्ही वहिनींमध्ये दादांना पाहतो”; पत्रातील दावे फेटाळले
व्हायरल झालेल्या पत्रातील मजकुरावर भाष्य करताना प्रज्ञा खोसरे म्हणाल्या की, “आम्ही सुनेत्रा वहिनींकडे आमच्या पालकमंत्री आणि नेत्या म्हणून आदराने पाहतो. वहिनींमध्ये आम्हाला अजितदादांची प्रतिमा दिसते. आम्ही ग्राउंड लेव्हलला त्यांच्या मार्गदर्शनानुसार काम करत आहोत. अशा परिस्थितीत माझ्यापासून त्यांच्या जिवाला धोका असल्याचे सांगून बदनामी करणे हे अत्यंत चुकीचे आहे. पक्षाने दिलेले सर्व प्रोटोकॉल पाळूनच आम्ही आमची जबाबदारी पार पाडत आहोत.”

निनावी पत्रामागे षडयंत्र; मानहानीचा दावा ठोकणार
कोणताही ठोस पुरावा नसताना केवळ निनावी पत्र व्हायरल करून आपली आणि पक्षाची प्रतिमा मलिन केली जात असल्याचा आरोप खोसरे यांनी केला आहे. “हे जाणीवपूर्वक रचलेले एक राजकीय षडयंत्र आहे. केवळ आमच्या पक्षातीलच नव्हे, तर इतर पक्षांतील लोकांचाही यात हात असू शकतो. केवळ राजकारण करण्यासाठी ही खालच्या पातळीची टीका सुरू आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले. याप्रकरणी गप्प न बसता, पत्र व्हायरल करणाऱ्यांविरुद्ध न्यायालयात मानहानीचा दावा दाखल करणार असल्याचेही त्यांनी यावेळी जाहीर केले.

हेही वाचा – Rahuri Byelection : राहुरी पोटनिवडणुकीत नवा ट्विस्ट! ‘तालुक्याच्या अस्मितेसाठी लढणार’; ठाकरेंच्या निष्ठावान नेत्याची बंडखोरी

बीडचे ‘खरात कनेक्शन’ चर्चेत
नाशिकच्या अशोक खरात प्रकरणात बीडमधील काही लोकांचे संबंध असल्याच्या चर्चेने आधीच जिल्हा हादरला असताना, आता त्यात थेट राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षांचे नाव ओढले गेल्याने वातावरण तापले आहे. मात्र, खोसरे यांनी हे सर्व आरोप धुडकावून लावत खरातशी आपले कोणतेही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे. या वादग्रस्त पत्रामुळे बीडच्या राजकारणात आता काय कायदेशीर वळण लागते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number