Iran Israel Conflict: ‘पुढील 48 तास जिथे आहात तिथेच राहा’; ट्रम्प यांच्या इराणवरील हल्ल्याच्या धमकीनंतर भारत सरकारचा अलर्ट

वाढत्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, भारत सरकारने इराणमध्ये वास्तव्यास असलेल्या आपल्या नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची मार्गदर्शक सूचना (Advisory) जारी केली आहे.

Iran Israel Conflict: ‘पुढील 48 तास जिथे आहात तिथेच राहा’; ट्रम्प यांच्या इराणवरील हल्ल्याच्या धमकीनंतर भारत सरकारचा अलर्ट

Iran Israel Conflict: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘स्ट्रेट ऑफ होर्मुझ’ (Strait of Hormuz) पुन्हा खुला न झाल्यास इराणवर मोठा लष्करी हल्ला करण्याची कडक चेतावणी दिली आहे. या वाढत्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, भारत सरकारने इराणमध्ये वास्तव्यास असलेल्या आपल्या नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची मार्गदर्शक सूचना (Advisory) जारी केली आहे. इराणची राजधानी तेहरान येथील भारतीय दूतावासाने सर्व भारतीयांना पुढील 48 तास अत्यंत सावध राहण्याचे निर्देश दिले आहेत.

भारतीय दूतावासाच्या कडक सूचना: घराबाहेर पडू नका
भारतीय दूतावासाने जारी केलेल्या सल्ल्यानुसार, इराणमधील भारतीय नागरिकांनी पुढील 48 तास ते जिथे आहेत, तिथेच थांबणे बंधनकारक आहे. नागरिकांना विनाकारण घराबाहेर न पडण्याचा सल्ला देण्यात आला आहे. विशेषतः वीज केंद्रे, लष्करी प्रतिष्ठाने आणि बहुमजली इमारतींच्या वरच्या मजल्यांपासून सुरक्षित अंतर राखण्यास सांगण्यात आले आहे, जेणेकरून संभाव्य हल्ल्याच्या वेळी जीवितहानी टाळता येईल. तसेच, दूतावासाने आरक्षित केलेल्या हॉटेल्समध्ये थांबलेल्या पर्यटकांनी तिथल्या दूतावासाच्या पथकांशी नियमित संपर्कात राहावे, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

आणीबाणीसाठी संपर्क क्रमांक जारी
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन भारतीय दूतावासाने 24 तास उपलब्ध असणारे आपत्कालीन संपर्क क्रमांक आणि ईमेल पत्ता जारी केला आहे. कोणत्याही मदतीसाठी किंवा माहितीसाठी नागरिक खालील क्रमांकांवर संपर्क साधू शकतात:
मोबाईल क्रमांक: +989128109115, +989128109102, +989128109109, +989932179359
ईमेल आयडी: cons.tehran@mea.gov.in

हेही वाचा – Donald Trump Warn Iran : ‘आज रात्री संपूर्ण संस्कृतीचा अंत होईल’, डोनाल्ड ट्रम्पची इराणला सर्वात मोठी धमकी; 48 तासांच्‍या अल्‍टिमेटमकडे संपूर्ण जगाचे लक्ष

डोनाल्ड ट्रम्प यांच्या आक्रमक भूमिकेमुळे मध्यपूर्वेतील तणाव शिगेला पोहोचला आहे. ‘स्ट्रेट ऑफ होर्मुझ’ हा जागतिक तेल व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाचा मार्ग असून, तो बंद झाल्यास जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होऊ शकतो. या संकटकाळात आपल्या नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी भारत सरकारने तातडीने पावले उचलली असून, परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number