Statue of Trump and Epstein : डोनाल्ड ट्रम्प आणि जेफ्री एपस्टीन यांचा ‘टायटॅनिक’ पोजमधील पुतळा सोशल मीडियावर व्हायरल; पाहा व्हिडीओ

नॅशनल मॉल परिसरात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि कुख्यात गुन्हेगार दिवंगत जेफ्री एपस्टीन यांचा एक वादग्रस्त पुतळा उभारण्यात आला आहे.

Statue of Trump and Epstein : डोनाल्ड ट्रम्प आणि जेफ्री एपस्टीन  यांचा ‘टायटॅनिक’ पोजमधील पुतळा सोशल मीडियावर व्हायरल; पाहा व्हिडीओ

Viral Statue of Trump and Epstein: मध्य पूर्वेतील तणाव शिगेला पोहोचलेला असतानाच, अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डीसीमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नॅशनल मॉल परिसरात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि कुख्यात गुन्हेगार दिवंगत जेफ्री एपस्टीन यांचा एक वादग्रस्त पुतळा उभारण्यात आला असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. ‘एपस्टीन फाइल्स’मधील खळबळजनक खुलाशांच्या पार्श्वभूमीवर या पुतळ्याने पुन्हा एकदा जुन्या वादांना तोंड फोडले आहे.

‘टायटॅनिक’ पोज आणि “द किंग ऑफ द वर्ल्ड”
रॉयटर्स आणि वॉशिंग्टन पोस्टच्या वृत्तानुसार, या पुतळ्याची रचना प्रसिद्ध चित्रपट ‘टायटॅनिक’मधील रोझ आणि जॅक यांच्या लोकप्रिय पोजपासून प्रेरित आहे. या स्मारकाला “द किंग ऑफ द वर्ल्ड” असे शीर्षक देण्यात आले आहे. पुतळ्यात जेफ्री एपस्टीन ट्रम्प यांच्याकडे पाठ करून उभा असल्याचे दाखवण्यात आले असून, ट्रम्प हसत त्याच्याकडे पाहत असल्याचे चित्रण करण्यात आले आहे. पुतळ्यावर लिहिलेल्या मजकुरात ट्रम्प आणि एपस्टीन यांच्या मैत्रीची तुलना आलिशान प्रवास, गुप्त पार्ट्या आणि वादग्रस्त प्रकरणांशी करण्यात आली आहे.

अज्ञात कलाकारांचे धाडस
हा पुतळा ‘गुप्त हँडशेक’ (Indecent Handshake) नावाच्या एका अज्ञात कलाकार समूहाने स्थापित केला असल्याचे सांगितले जाते. वॉशिंग्टन डीसीच्या नॅशनल मॉलसारख्या संवेदनशील ठिकाणी हा पुतळा अचानक दिसल्याने प्रशासनाची धावपळ उडाली आहे. जेफ्री एपस्टीनवर अनेक मुलींवर अत्याचार आणि लैंगिक तस्करीचे गंभीर आरोप होते. या प्रकरणाशी संबंधित कागदपत्रांमध्ये अनेक बड्या व्यक्तींची नावे समोर आली होती, ज्यात डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावाचाही उल्लेख वारंवार झाला आहे.

हेही वाचा – Reliance Oil Refinery: युद्धाच्या वणव्यात दिलासा देणारी बातमी; अमेरिकेत 50 वर्षांनंतर उभी राहणार नवी ऑइल रिफायनरी, भारताच्या ‘रिलायन्स’ची मोठी गुंतवणूक

वाढता जागतिक तणाव आणि वेळ
विशेष म्हणजे, हा पुतळा अशा वेळी समोर आला आहे जेव्हा अमेरिका आणि इराणमधील संघर्ष वेगाने वाढत आहे. मध्य पूर्वेतील युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक राजकारण तापलेले असताना, अमेरिकेच्या अंतर्गत राजकारणातील हे वादग्रस्त पडसाद चर्चेचा विषय ठरले आहेत. या पुतळ्याच्या माध्यमातून कलाकारांनी एपस्टीन प्रकरणातील अद्याप उघड न झालेल्या सत्यांकडे जगाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number