MSRTC Solar Energy Project: आता ST महामंडळ करणार वीज निर्मिती; वर्षाला वाचणार कोट्यवधी रुपये, परिवहन मंत्र्यांनी केली ‘ही’ मोठी घोषणा

एसटीची बसस्थानके, विभागीय कार्यालये आणि आगारांच्या (Depot) छतावर सौर पॅनेल बसवून वीज निर्मिती करण्याचा 'गेमचेंजर' प्लॅन प्रशासनाने आखला आहे.

MSRTC Solar Energy Project: आता ST महामंडळ करणार वीज निर्मिती; वर्षाला वाचणार कोट्यवधी रुपये, परिवहन मंत्र्यांनी केली ‘ही’ मोठी घोषणा

MSRTC Solar Energy Project: आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) आता आत्मनिर्भरतेकडे मोठे पाऊल उचलले आहे. 'गाव तिथे एसटी' या ब्रीदानुसार सेवा देणारे महामंडळ आता स्वतःची वीज स्वतःच तयार करणार आहे. एसटीची बसस्थानके, विभागीय कार्यालये आणि आगारांच्या (Depot) छतावर सौर पॅनेल बसवून वीज निर्मिती करण्याचा 'गेमचेंजर' प्लॅन प्रशासनाने आखला आहे. यामुळे महामंडळाच्या आधुनिकतेच्या प्रवासाला आता सौर ऊर्जेची जोड मिळणार आहे.

13 कोटींच्या 'ग्रीड सोलर' प्रकल्पाला हिरवा कंदील
परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याला प्रशासकीय आणि वित्तीय मंजुरी दिली आहे. या प्रकल्पासाठी साधारण 13.03 कोटी रुपयांच्या निधीला मान्यता देण्यात आली आहे. या माध्यमातून महामंडळाच्या मोकळ्या जागा आणि इमारतींच्या छताचा प्रभावी वापर करून सुमारे 2.57 मेगावॉट वीज निर्मिती केली जाईल. एसटी महामंडळ आता पारंपरिक ऊर्जेकडून शाश्वत ऊर्जेकडे वळत असल्याचे हे संकेत आहेत.

तिजोरीवरील भार कमी होणार; 3 ते 4 कोटींची वार्षिक बचत
पारंपरिक वीज बिलापोटी एसटी महामंडळाला दरवर्षी मोठी रक्कम खर्च करावी लागते. या सौर प्रकल्पामुळे महामंडळाच्या कार्यशाळा आणि कार्यालयांच्या वीज वापरात मोठी कपात होणार आहे. यामुळे वर्षाला सुमारे 3 ते 4 कोटी रुपयांची बचत होईल, असा विश्वास प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला आहे. आर्थिक बचतीसोबतच हा प्रकल्प 'हरित महाराष्ट्र' मोहिमेसाठी पर्यावरणपूरक ठरणार असून कार्बन उत्सर्जन कमी करण्यास मदत करेल.

हेही वाचा – MSRTC Brand Ambassador: मकरंद अनासपुरेंनंतर आता 'ही' जोडी करणार लालपरीचं ब्रँडिंग; प्रताप सरनाईकांनी केली मोठी घोषणा

कडक अंमलबजावणी आणि तांत्रिक निकष
प्रशासनाकडून हा प्रकल्प राबवताना तांत्रिक निकष आणि पर्यावरणीय नियमांचे उल्लंघन होऊ नये, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. एसटीच्या आधुनिकतेच्या प्रवासात सौर ऊर्जेचा वापर हा महामंडळाला आर्थिक शिस्त लावण्याच्या दृष्टीने मैलाचा दगड ठरणार आहे. विशेष म्हणजे, दुर्गम भागातील बसस्थानकांवरही या सौर ऊर्जेचा वापर करून प्रवाशांना चांगल्या सुविधा देणे आता शक्य होणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number