Agnimitra Paul: श्रीदेवी-काजोलची डिझायनर बनली आमदार; अग्निमित्रा पॉल यांचा 40,000 मतांनी दणदणीत विजय

एकेकाळी फॅशन डिझायनर असलेल्या अग्निमित्रा यांनी तृणमूल काँग्रेसच्या (TMC) तापस बॅनर्जी यांचा 40,839 मतांच्या फरकाने दणदणीत पराभव केला.<br/>

Agnimitra Paul: श्रीदेवी-काजोलची डिझायनर बनली आमदार; अग्निमित्रा पॉल यांचा 40,000 मतांनी दणदणीत विजय

Agnimitra Paul: 2026 च्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपची त्सुनामी पाहायला मिळाली. जलपाईगुडीपासून जंगलमहालपर्यंत भगवी लाट उसळली असताना, आसनसोल दक्षिण मतदारसंघात भाजपच्या उमेदवार अग्निमित्रा पॉल (Agnimitra Paul) यांनी आपला करिश्मा दाखवून दिला आहे. एकेकाळी फॅशन डिझायनर असलेल्या अग्निमित्रा यांनी तृणमूल काँग्रेसच्या (TMC) तापस बॅनर्जी यांचा 40,839 मतांच्या फरकाने दणदणीत पराभव केला.

अग्निमित्रा यांचा विजय
आसनसोल दक्षिण मतदारसंघातून अग्निमित्रा पॉल यांना एकूण 1,19,582 मते मिळाली, तर त्यांचे प्रतिस्पर्धी तापस बॅनर्जी यांना 78,743 मतांवर समाधान मानावे लागले. या त्रिकोणी लढतीत काँग्रेसचे सौविक मुखर्जी यांचाही समावेश होता. मात्र, अग्निमित्रा यांनी मतदारांवर आपली छाप पाडत हा मतदारसंघ भाजपच्या खिशात टाकला.

ग्लॅमर ते राजकारण: श्रीदेवी-काजोल यांच्यासाठी केलंय डिझाइन
अग्निमित्रा पॉल यांचा प्रवास एखाद्या चित्रपट कथेसारखा आहे. आंतरराष्ट्रीय फॅशन डिझायनर म्हणून मोठे नाव कमावलेल्या अग्निमित्रा यांनी 'लॅक्मे फॅशन वीक'सारखे मोठे मंच गाजवले आहेत. त्यांनी बॉलीवूड सुपरस्टार श्रीदेवी, काजोल, मिथुन चक्रवर्ती आणि विवेक ओबेरॉय यांच्यासाठी पोशाख डिझाइन केले होते. मात्र, 2019 मध्ये ग्लॅमरच्या जगाला रामराम ठोकून त्यांनी राजकारणात प्रवेश केला.

आसनसोलची कन्या आणि आक्रमक चेहरा
अग्निमित्रा पॉल यांची गणना भाजपच्या सर्वात आक्रमक महिला नेत्यांमध्ये केली जाते. निवडणुकीच्या रिंगणात त्यांनी स्वतःला कधीही 'बाहेरची व्यक्ती' म्हणवून घेतले नाही, तर सातत्याने आसनसोलची कन्या म्हणून आपली ओळख करून दिली. त्यांच्या याच स्थानिक कनेक्टमुळे आणि आक्रमक प्रचारशैलीमुळे त्या भाजपच्या 'स्टार प्रचारक' ठरल्या.

हेही वाचा – West Bengal Election Result 2026 : 'पिक्चर अभी बाकी हैं!' ममता बॅनर्जी मतमोजणी केंद्रावर उपस्थित; शिल्लक 20 जागांच्या निकालांनी वाढवला सस्पेन्स

पाच वर्षांत संपत्तीत मोठी वाढ
निवडणुकीसाठी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, अग्निमित्रा यांची संपत्ती चर्चेचा विषय ठरली आहे. फॅशन विश्वातून आलेल्या अग्निमित्रा यांची एकूण निव्वळ संपत्ती 3.84 कोटी आहे. विशेष म्हणजे, 2021 मध्ये त्यांची जंगम मालमत्ता 1.10 कोटी होती, ती 2026 मध्ये वाढून 2.56 कोटी झाली आहे. त्यांची स्थावर मालमत्ता मात्र 1.28 कोटीवर स्थिर आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number