Akshay Tritiya 2026 Wishes : अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर, तुमच्या प्रियजनांना अन् मित्र-मैत्रिणींना पाठवा मराठीतून शुभेच्छा!

सनातन धर्मीयांची श्रद्धा असलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या या मंगलदिनी केलेले कोणतेही कार्य 'अक्षय्य' राहते, अशी जनमानसात प्रबळ विश्वास आहे.

Akshay Tritiya 2026 Wishes : अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर, तुमच्या प्रियजनांना अन् मित्र-मैत्रिणींना पाठवा मराठीतून शुभेच्छा!

Akshay Tritiya Shubhecha Sandesh in Marathi : सनातन संस्कृतीमध्ये अक्षय्य तृतीया हा दिवस अतिशय शुभ मानला जातो. सनातन धर्मीयांची श्रद्धा असलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या या मंगलदिनी केलेले कोणतेही कार्य 'अक्षय्य' राहते, अशी जनमानसात प्रबळ धारणा आहे. यंदा रविवारी, 19 एप्रिल 2026 रोजी अक्षय्य तृतीयेचा सण साजरा केला जाणार आहे. याच शुभ पर्वाचे औचित्य साधून आपल्या नातेवाइकांना, मित्र-मैत्रिणींना आणि प्रियजनांना खास मराठमोळ्या शैलीत शुभेच्छा देण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी काही निवडक संदेश घेऊन आलो आहोत, जेणेकरून तुमचा हा सण अधिक आनंददायी होईल.

1. अक्षय्य तृतीयेच्या या शुभ मुहूर्तावर,  तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी  आणि समाधान अक्षय्य राहो.. अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा!

2. तुमचे प्रत्येक काम असावे परिपूर्ण,
न काही राहो अपूर्ण,
दुःख, दारिद्र्याचा करूनी नाश
घरात होवो देवी लक्ष्मीचा निवास!

3. आज अक्षय्य तृतीया, साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक सुंदर मुहूर्त..! आपल्या आयुष्यात अक्षय सुख, धनसंपदा ,मैत्री आणि आरोग्य लाभो, हिच ईश्वर चरणी प्रार्थना..! माझ्या कडून तुम्हाला, अक्षय्य तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा..! 

4. क्षय व्हावी दरिद्रता अन्
दूर व्हावे दुःख तुमचे,
अक्षय्य तृतीयेच्या मंगल दिनापासूनी
ऐश्वर्य, धन-संपत्तीसह सुदृढ राहावे आरोग्य तुमचे!

5. गोड सांज, सुवर्ण क्षण,  अक्षय्य तृतीयेचे मंगलमय आगमन आपणास सुखद आरोग्याची आणि समृद्धीची प्राप्ती होवो.

6. घन न घन जसा बरसतो ढग,
धो धो जसा कोसळतो पाऊस
चारही दिशेत संचारते ऊर्जा!
तशीच होवो आपल्या दारी धनाची वर्षा,
मंगलमय होवो अक्षय्य तृतीयेचा पावन सण!

7. आशा आहे या मंगलदिनी, आपल्या जीवनात नवचैतन्य येवो.. येणारे दिवस आपल्या जीवनात आनंद, सुख, समाधान घेऊन येवो.. अक्षय्य तृतीयेच्या मंगलमय शुभेच्छा..!

8. घरात तुमच्या देवी लक्ष्मीचा वास असो,
प्रत्येक विचारामध्ये देवी सरस्वतीची साथ असो,
संरक्षण करण्यास आसपास देवी दुर्गेचा वास असो,
तसाच आई-वडिलांचा आशीर्वाद असो,
त्यांच्याच पुण्याईने जीवन जाई उजळूनी,
येई सुख, समृद्धी अन् लाभ जीवनी,
बंधुभाव वाढे जनगणमनी…
शुभेच्छा आपणास अक्षय्य तृतीयेच्या पावन दिनी…!

9. अक्षय राहो सुख तुमचे…
अक्षय राहो धन तुमचे…
अक्षय राहो प्रेम तुमचे…
अक्षय राहो आरोग्य तुमचे…
असो तुमची कीर्ती अपरंपार..
होवो तुमचा सदा जयजयकार…
अक्षय्य तृतीया दिनाच्या आपणास मंगलमय शुभेच्छा..!

10. नुसतीच नाही सोने-चांदीची खरेदी
दानाचंही आहे महत्त्व या दिवशी
हा सण आहे भरभराटीचा…
हा सण आहे दानधर्माचा..
अक्षय्य पुण्याची प्राप्ती करून देणारा सण!
सर्वांना मिळो मनाचे बळ…
सर्वांना मिळो अक्षय फळ…
अक्षय्य तृतीयेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!

11. अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने लक्ष्मीच्या कृपेसोबतच तुमच्यावर आप्तजनांच्या प्रेमाचाही वर्षाव होवो…
अक्षय्य तृतीयेच्या या शुभ दिवशी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होवोत
अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा!

12. अक्षय्य होवो मानवता
मत्सराचा होऊ दे क्षय
प्रेमाचा होऊ दे वर्षाव अन्
द्वेष करणाऱ्यांनाच खरे भय
अक्षय्य तृतीयेच्या शुभेच्छा!!

13. “जीवनदीप जाई उजळुनी,
सुख, समृद्धी लाभो जीवनी,
भक्ती-प्रेमरस ओथंबुनी,
बंधुभाव वाढे जनगणमनी,
अक्षय्य तृतीयेच्या अक्षय्य शुभेच्छा…”

14. दारी तुमच्या सोनपावलांनी व्हावे लक्ष्मीचे आगमन
चारही दिशा जाव्या उजळून,
अलक्ष्मीचा नाश होऊन
सुख-समृद्धी, संपत्ती वाहू दे भरभरून!
अक्षय्य तृतीयेच्या चैतन्यमय अक्षय्य शुभेच्छा…

15. तुमच्या घरावर होवो धनाची बरसात खास…
लक्ष्मीचा असो सदैव वास…
संकटाचा होवो नाश…
शांतीचा असो वास…
अक्षय्य तृतीयाच्या शुभेच्छा!

हेही वाचा – Akshaya Tritiya 2026 : अक्षय्य तृतीयेला घरात लावा तुळशीचे नवे रोप; सुखाची होईल भरभराट

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number