SA vs NZ : पहिल्या उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेचे न्यूझीलंडसमोर 170 धावांचे लक्ष्य; मार्को जॅनसेनने झळकावलं अर्धशतक

दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडसमोर विजयासाठी 170 धावांचे आव्हान ठेवले आहे. या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.

SA vs NZ : पहिल्या उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेचे न्यूझीलंडसमोर 170 धावांचे लक्ष्य; मार्को जॅनसेनने झळकावलं अर्धशतक

SA vs NZ :  टी-20 विश्वचषक 2026 आता त्याच्या निर्णायक टप्प्यात पोहोचला असून कोलकाता येथील ऐतिहासिक ईडन गार्डन्सवर पहिला हाय-व्होल्टेज उपांत्य सामना रंगला आहे. दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडसमोर विजयासाठी 170 धावांचे आव्हान ठेवले आहे. या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. आफ्रिकन संघाने निर्धारित 20 षटकांत 8 गडी गमावून ही धावसंख्या उभारली आहे.

मार्को जॅनसेनचे झुंजार अर्धशतक
दक्षिण आफ्रिकेची धावसंख्या सन्मानजनक स्थितीत पोहोचवण्यात अष्टपैलू खेळाडू मार्को जॅनसेनने मोलाची भूमिका बजावली. जॅनसेनने अवघ्या 27 चेंडूंमध्ये षटकार ठोकत आपले शानदार अर्धशतक पूर्ण केले. त्याने संयमी पण आक्रमक फलंदाजी करत न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा सामना केला. जॅनसेनला दुसऱ्या टोकाकडून कॉर्बिन बॉशने साथ दिली. त्याआधी, स्थिरावलेला फलंदाज ट्रिस्टन स्टब्स 19 व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर बाद झाला. त्याने 24 चेंडूत 29 धावांचे योगदान दिले.

दोन्ही संघांत महत्त्वाचे बदल
या महत्त्वाच्या सामन्यासाठी दोन्ही संघांनी आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल केले आहेत. न्यूझीलंडच्या संघात जिमी नीशमचे पुनरागमन झाले असून ईश सोधीला या सामन्यातून विश्रांती देण्यात आली आहे. दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकेने आपला संघ अधिक मजबूत करत कागिसो रबाडा, मार्को जॅनसेन आणि केशव महाराज या दिग्गज खेळाडूंना संघात परत आणले आहे. या स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेचा संघ आतापर्यंत अजिंक्य राहिला असून त्यांनी सुपर 8 मध्ये भारत आणि वेस्ट इंडिजसारख्या बलाढ्य संघांना पराभूत केले आहे.

हेही वाचा – Babar Azam: पाकिस्तान क्रिकेटमध्ये मोठा भूकंप! बाबर आझमचा पत्ता कट; टी-20 विश्वचषकातील फ्लॉप शो नंतर PCB कडून घोषणा

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन:
दक्षिण आफ्रिका:
एडेन मार्कराम (कर्णधार), क्विंटन डी कॉक, रायन रिकेल्टन, डेवाल्ड ब्रुविस, डेव्हिड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, मार्को जॅनसेन, कॉर्बिन बॉश, कागिसो रबाडा, केशव महाराज, लुंगी एनगिडी.
न्यूझीलंड: टिम सेफर्ट, फिन ऍलन, रचिन रवींद्र, ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, डॅरिल मिशेल, जिमी नीशम, मिशेल सँटनर (कर्णधार), कोल मॅककोंची, मॅट हेन्री, लॉकी फर्ग्युसन.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number