Solapur Zilla Parishad: सोलापूर ZP चा इंधन बचतीसाठी खास उपक्रम; पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर महाराष्ट्रासमोर ठेवला ‘हा’ नवा आदर्श

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील इंधन बचतीसाठी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत सोलापूर जिल्हा परिषद प्रशासनाने एक आदर्श निर्णय घेतला आहे.

Solapur Zilla Parishad: सोलापूर ZP चा इंधन बचतीसाठी खास उपक्रम; पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर महाराष्ट्रासमोर ठेवला ‘हा’ नवा आदर्श

Solapur Zilla Parishad:  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील इंधन बचतीसाठी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत सोलापूर जिल्हा परिषद प्रशासनाने एक आदर्श निर्णय घेतला आहे. पर्यावरणाचे रक्षण आणि इंधनाचा वाढता खर्च कमी करण्यासाठी जिल्हा परिषदेने आता दर सोमवारी ‘नो व्हेईकल डे’ (No Vehicle Day) पाळण्याचे ठरवले असून, त्याचे अधिकृत आदेश जारी करण्यात आले आहेत. सोलापूर पॅटर्नचा हा नवा नियम आता संपूर्ण महाराष्ट्रासाठी दिशादर्शक ठरणार आहे.

काय आहे नवा नियम?
सोलापूर जिल्हा परिषदेचे सर्व पदाधिकारी, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी आठवड्याचा पहिला दिवस म्हणजेच प्रत्येक सोमवार हा वाहनमुक्त असेल. या दिवशी खाजगी दुचाकी किंवा चारचाकी गाड्या आणण्यास सक्त मनाई आहे. शासकीय वाहनांचा वापरही पूर्णपणे टाळला जाणार आहे. त्याऐवजी कर्मचारी सार्वजनिक बस सेवा, सायकल, इलेक्ट्रिक वाहने किंवा पायी चालत कार्यालयात येतील.

का घेतला हा निर्णय?
जागतिक स्तरावरील युद्धजन्य परिस्थिती आणि तणावामुळे पेट्रोल-डिझेलच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर भारताचा इंधन आयात खर्च कमी व्हावा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. या आवाहनाची अंमलबजावणी करत सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य आणि उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांनी हा स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे.

हेही वाचा – Pratap Sarnaik : बाईक, टॅक्सी ॲप्सविरोधात सरकारचा मोठा निर्णय; प्रताप सरनाईकांचे सायबर विभागाला पत्र

पर्यावरण रक्षणाचा संदेश
वाढते वायू प्रदूषण आणि जागतिक तापमानवाढ (Global Warming) या संकटांशी लढण्यासाठी 'नो व्हेईकल डे' हे एक प्रभावी पाऊल ठरणार आहे. केवळ घोषणा न करता, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वतः सायकल किंवा पायी येऊन कर्मचाऱ्यांसमोर आदर्श ठेवावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. शाश्वत जीवनशैलीचा अवलंब करण्यासाठी आणि वसुंधरेचे रक्षण करण्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांनी या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा परिषद प्रशासनाकडून करण्यात आले आहे. सोलापूरच्या या निर्णयाचे सध्या संपूर्ण राज्यभरातून कौतुक होत आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number