POCSO Case: मेहुणीला स्वप्न पडलं अन् मेहुणा गेला तुरुंगात; 7 वर्षांनंतर सुटला हवाई दलाच्या जवानाचा कायदेशीर फास, काय आहे नेमकं प्रकरण? वाचा

हवाई दलातील जवान अनुराग शुक्ला यांच्या घरी त्यांची 15 वर्षीय मेहुणी राहायला आली होती. त्या रात्री शुक्ला यांनी तिचा विनयभंग केल्याचा आरोप करण्यात आला होता.

POCSO Case: मेहुणीला स्वप्न पडलं अन् मेहुणा गेला तुरुंगात; 7 वर्षांनंतर सुटला हवाई दलाच्या जवानाचा कायदेशीर फास, काय आहे नेमकं प्रकरण? वाचा

POCSO Case: एखाद्या स्वप्नामुळे एखाद्याचे हसतेखेळते आयुष्य कसे उद्ध्वस्त जाऊ होऊ शकते, याचा संतापजनक आणि धक्कादायक प्रकार कानपूरमध्ये समोर आला आहे. स्वतःच्या मेहुणीला पडलेल्या एका 'स्वप्ना'मुळे भारतीय हवाई दलाच्या (IAF) एका जवानाला तब्बल 7 वर्षे कायदेशीर लढाई लढावी लागली आणि तुरुंगवासही सोसावा लागला. अखेर 7 वर्षांनंतर पीडितेने न्यायालयात दिलेल्या एका कबुलीमुळे या जवानाची सन्मानपूर्वक निर्दोष मुक्तता झाली आहे.

नेमका प्रकार काय? 
प्राप्त माहितीनुसार, ही घटना 8 मार्च 2019 रोजी घडली होती. हवाई दलातील जवान अनुराग शुक्ला यांच्या घरी त्यांची 15 वर्षीय मेहुणी राहायला आली होती. त्या रात्री शुक्ला यांनी तिचा विनयभंग केल्याचा आरोप करण्यात आला होता. याप्रकरणी ऑगस्ट 2019 मध्ये 'पॉक्सो' (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल होऊन शुक्ला यांना अटक करण्यात आली. मात्र, खटल्याच्या सुनावणीदरम्यान पीडितेने दिलेली साक्ष थक्क करणारी होती. ती म्हणाली, "त्यावेळी मी आजारी होते आणि कडक औषधे घेत होते. त्या रात्री मला स्वप्न पडले की कोणीतरी मला पकडले आहे, त्यामुळे मी घाबरून आरडाओरडा केला. प्रत्यक्षात मेहुण्याने तसे काहीही केले नव्हते."

एका जवानाचे करिअर आणि प्रतिष्ठा धुळीला
केवळ एका गैरसमजामुळे किंवा पडलेल्या स्वप्नामुळे अनुराग शुक्ला यांना 19 दिवस तुरुंगात राहावे लागले. पण या प्रकरणाचे परिणाम अत्यंत भीषण होते. या खटल्यामुळे 2020 मध्ये त्यांना 'कॉर्पोरल' पदावर मिळणारी पदोन्नती नाकारण्यात आली. 7 वर्षे चाललेल्या या कायदेशीर लढाईमुळे त्यांची सामाजिक प्रतिष्ठा आणि आर्थिक स्थिती पूर्णपणे ढासळली. या काळात त्यांना प्रचंड मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले.

हेही वाचा –  Badlapur Egg Selling Racket: बदलापूर स्त्री बीज विक्री प्रकरणात मोठा ट्विस्ट; नाशिक आयव्हीएफ सेंटरचे कनेक्शन समोर

मालमत्तेच्या वादातून जाणीवपूर्वक जाळ्यात ओढले?
अनुराग शुक्ला यांनी न्यायालयात एक गंभीर आरोप केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांचे सासरे त्यांना त्यांची मालमत्ता पत्नी आणि मेहुणीच्या नावावर करण्यासाठी वारंवार दबाव टाकत होते. जेव्हा त्यांनी याला नकार दिला, तेव्हा त्यांना या खटल्यात जाणीवपूर्वक अडकवण्यात आले असावे. पीडितेच्या कुटुंबीयांनीही हा प्रकार केवळ 'गैरसमज' असल्याचे मान्य केल्यामुळे विशेष पॉक्सो न्यायालयाने सर्व आरोपांतून शुक्ला यांची मुक्तता केली. मात्र, या 7 वर्षांत झालेल्या नुकसानाची भरपाई कोण करणार, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number