Kiren Rijiju Rahul Gandhi Meeting : संसदेच्या पावसाळी अधिवेशनात पडद्यामागे मोठ्या घडामोडी; किरेन रिजिजू-राहुल गांधी यांच्या भेटीत नेमकी कोणत्या विषयावर चर्चा?

आगामी महत्त्वाची विधेयके सुरळीतपणे मंजूर करून घेण्यासाठी आणि सभागृहाचे कामकाज पूर्ववत करण्यासाठी ही महत्त्वपूर्ण बैठक झाली.

Kiren Rijiju Rahul Gandhi Meeting : संसदेच्या पावसाळी अधिवेशनात पडद्यामागे मोठ्या घडामोडी; किरेन रिजिजू-राहुल गांधी यांच्या भेटीत नेमकी कोणत्या विषयावर चर्चा?

Kiren Rijiju Rahul Gandhi Meeting : संसदेच्या पावसाळी अधिवेशनातील सत्ताधारी आणि विरोधकांमधील वाढता ताण कमी करण्यासाठी केंद्र सरकारकडून विशेष पुढाकार घेतला जात आहे. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची दोन दिवसांत दुसऱ्यांदा भेट घेतली. आगामी महत्त्वाची विधेयके सुरळीतपणे मंजूर करून घेण्यासाठी आणि सभागृहाचे कामकाज पूर्ववत करण्यासाठी ही महत्त्वपूर्ण बैठक झाली. रिजिजू यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर, विरोधी पक्षांची एकजूट लक्षात घेऊन ‘इंडिया’ (INDIA) आघाडीच्या सर्व घटक पक्षांशी चर्चा करूनच अंतिम निर्णय घेतला जाईल, अशी स्पष्ट भूमिका राहुल गांधी यांनी मांडली आहे.

सत्ताधारी-विरोधकांनी देशहितासाठी एकत्र येण्याचे रिजिजूंचे आवाहन

सभागृहात गदारोळ होत असतानाही विधेयके मंजूर होत असली, तरी विरोधकांनी चर्चेत सहभागी व्हावे अशी सरकारची इच्छा असल्याचे किरेन रिजिजू यांनी स्पष्ट केले. विरोधकांच्या सततच्या गदारोळामुळे नवीन खासदारांना बोलण्याची संधी मिळत नसल्याची खंत व्यक्त करत रिजिजू म्हणाले, "पंतप्रधान आणि गृहमंत्री संसदेतच उपस्थित असतात. आम्ही एकमेकांचे राजकीय विरोधक नक्कीच आहोत, परंतु शत्रू नाही. त्यामुळे देशहिताच्या मुद्द्यांवर संवाद सुरू राहणे आवश्यक आहे." सरकारकडे संख्याबळ असले तरी प्रमुख विरोधी पक्षाला सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा – CJP Committee Members : अभिजीत दीपकेंनी आखली पुढील रणनीती! CJP ची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर; 13 सदस्यांवर सोपवली मोठी जबाबदारी

पंतप्रधान व गृहमंत्र्यांच्या उत्तरावर विरोधी पक्ष ठाम 

दुसऱ्या बाजूला, काँग्रेससह संपूर्ण विरोधी पक्षाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी स्वतः सभागृहात उपस्थित राहून महत्त्वाच्या मुद्द्यांवर उत्तरे द्यावीत, ही आपली मागणी कायम ठेवली आहे. काँग्रेसने आरोप केला आहे की सरकार महत्त्वाच्या विषयांवर चर्चेपासून पळ काढत असून भ्रमाचे वातावरण तयार करत आहे. त्यामुळे एका बाजूला चर्चेच्या फेऱ्या सुरू असल्या तरी, दुसऱ्या बाजूला सभागृहातील गदारोळ थांबणार की सत्ताधारी-विरोधकांमधील ही कोंडी कायम राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number