Copper Bottle : तांब्याच्या बाटलीत चुकूनही टाकू नका ‘या’ 3 गोष्टी; नाही तर आरोग्य सुधारण्याऐवजी होईल विषबाधा!

गेल्या काही वर्षांत तांब्याच्या बाटलीतून (Copper Bottle) पाणी पिण्याचा ट्रेंड प्रचंड वाढला आहे. मात्र, योग्य प्रकारे तांब्याच्या भांड्यांचा वापर न केल्यास त्याचा तोटा होऊ शकतो.

Copper Bottle : तांब्याच्या बाटलीत चुकूनही टाकू नका ‘या’ 3 गोष्टी; नाही तर आरोग्य सुधारण्याऐवजी होईल विषबाधा!

Copper Bottle Toxicity: गेल्या काही वर्षांत आरोग्याविषयी जागरूक असलेल्या नागरिकांमध्ये तांब्याच्या बाटलीतून (Copper Bottle) पाणी पिण्याचा ट्रेंड प्रचंड वाढला आहे. आयुर्वेदामध्ये तांब्याच्या भांड्यात साठवलेल्या पाण्याला 'ताम्रजल' म्हटले असून ते आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले गेले आहे. मात्र, योग्य माहिती नसल्याने अनेक लोक या बाटल्यांचा अत्यंत चुकीच्या पद्धतीने वापर करून स्वतःच्याच आरोग्याला मोठ्या धोक्यात ढकलत आहेत. बरेच जण वजन कमी करण्यासाठी किंवा डिटॉक्सिफिकेशनसाठी तांब्याच्या बाटलीत लिंबू पाणी, जिरे पाणी किंवा कढत गरम पाणी तासनतास आणि रात्रभर भरून ठेवतात. डॉक्टरांच्या मते, असे करणे आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरू शकते, कारण यामुळे पाण्यात रासायनिक प्रक्रिया होऊन विषबाधा होण्याचा मोठा धोका निर्माण होतो.

लिंबू, जिरे पाणी आणि गरम पाणी तांब्याच्या संपर्कात आल्यास काय होते?
तांब्याच्या बाटलीमध्ये कोणतेही आम्लयुक्त (Acidic) किंवा गरम द्रवपदार्थ ठेवल्यास 'कॉपर लीचिंग' (Copper Leaching) प्रक्रिया वेगाने सुरू होते. म्हणजेच तांबे अत्यंत जलद गतीने पाण्यात विरघळू लागते आणि पाण्याचे रासायनिक संतुलन बिघडते. या विघातक बदलांची मुख्य कारणे खालीलप्रमाणे आहेत:
– लिंबू आणि जिरे पाणी: लिंबू आणि जिऱ्यामध्ये नैसर्गिक आम्लता (Acidity) असते. हे ॲसिडिक लिक्विड तांब्यासोबत रासायनिक क्रिया करून अत्यंत विषारी 'कॉपर सॉल्ट्स' (Toxic Copper Salts) तयार करतात, जे थेट पोटात जातात.
– गरम पाणी: तांब्याच्या बाटलीत कडक उकळलेले किंवा कोमट गरम पाणी टाकल्यास तांबे विरघळण्याचा वेग कैक पटीने वाढतो. यामुळे पाण्यातील कॉपरचे प्रमाण सुरक्षित पातळी ओलांडून कमालीचे विषारी बनते.
त्यामुळे डॉक्टर आणि आहारतज्ज्ञांच्या मते, तांब्याच्या बाटलीत फक्त आणि फक्त साधे पाणीच साठवले पाहिजे.

हेही वाचा – Kidney Health: ‘बिअर प्यायल्याने किडनी स्टोन लगेच बाहेर पडतो’ हा समज किती खरा? तज्ज्ञांनी सांगितलं वास्तव

बाटलीच्या आतील हिरवे डाग म्हणजे काय? कॉपर टॉक्सिसिटीची लक्षणे ओळखा
अनेकदा तांब्याच्या बाटलीच्या आत किंवा बाहेर हिरवट रंगाचे डाग किंवा थर जमा झालेला दिसतो. हे हिरवे डाग म्हणजेच कॉपरचे झालेले 'ऑक्सिडेशन' (Oxidation) असून वैज्ञानिक भाषेत याला कॉपर कार्बोनेट म्हणतात. हा थर जरी बाटलीच्या बाहेरच्या बाजूला असेल तर तो विषारी नसतो, परंतु जर तो बाटलीच्या आतल्या बाजूला जमा झाला असेल, तर मात्र बाटली तातडीने स्वच्छ करणे अनिवार्य आहे. जर हा थर तसाच राहिला आणि त्यातून पाणी प्यायले गेले, तर शरीरात 'कॉपर टॉक्सिसिटी' (Copper Toxicity) म्हणजेच तांब्याची विषबाधा होते. याची मुख्य लक्षणे अशी आहेत:
– मळमळणे आणि सतत उलट्या होणे
– पोटात तीव्र पेटके येणे आणि कळा येऊ लागणे
– जुलाब आणि डायरियाचा त्रास होणे
– लहान मुलांच्या शरीराचा आकार आणि अवयव लहान असल्याने त्यांच्यामध्ये या विषबाधेचा धोका प्रौढांपेक्षा कितीतरी जास्त असतो.

तांब्याची बाटली वापरण्याची योग्य पद्धत
तांब्याच्या बाटलीतून पाण्याचे पूर्ण आरोग्यदायी लाभ मिळवण्यासाठी खालील नियमांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे:
– बाटलीमध्ये फक्त आणि फक्त साधे आणि थंड पाणीच साठवावे.
– गुणकारी 'ताम्रजल' तयार होण्यासाठी पाणी किमान 6 ते 12 तास तांब्याच्या बाटलीत ठेवावे.
– बाटलीत लिंबू, जिरे, मध, व्हिनेगर किंवा कोणतेही फ्लेवर्ड पदार्थ कधीही टाकू नयेत.
– तांब्याच्या भांड्यात चुकूनही गरम पाणी भरू नये.
– बाटलीच्या आत हिरवा थर साचू नये म्हणून दररोज किंवा दोन दिवसांतून एकदा बाटली आतून नीट घासून स्वच्छ करावी.

हेही वाचा – तुम्हीही AC लावून झोपता का? AC मध्ये झोपणाऱ्यांना वाटतं आजारी असल्यासारखं; खरं आहे का?, जाणून घ्या सत्य

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number