Shraddha Kapoor : फायनल झालं! श्रद्धा कपूर लवकरच होणार नवरी; लग्नाच्या चर्चांवर अभिनेत्रीने अखेर हे उत्तर दिलं

श्रद्धाने अलीकडेच तिच्या एका चाहत्याला दिलेल्या मजेशीर उत्तराचा स्क्रीनशॉट इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहे.

Shraddha Kapoor : फायनल झालं! श्रद्धा कपूर लवकरच होणार नवरी; लग्नाच्या चर्चांवर अभिनेत्रीने अखेर हे उत्तर दिलं

Shraddha Kapoor : बॉलिवूडची ‘आशिकी गर्ल’ श्रद्धा कपूर तिच्या प्रोफेशनल लाईफपेक्षा सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे अधिक चर्चेत आहे. “तू लग्न कधी करणार?” हा प्रश्न तिचे चाहते तिला सोशल मीडियावर वारंवार विचारत असतात. अशातच, श्रद्धाने अलीकडेच तिच्या एका चाहत्याला दिलेल्या मजेशीर उत्तराचा स्क्रीनशॉट इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहे. ज्वेलरी ब्रँडच्या प्रमोशनसाठी पोस्ट केलेल्या एका व्हिडिओवर चाहत्याने जेव्हा लग्नाबद्दल विचारले, तेव्हा श्रद्धाने “मी करणार, लवकरच लग्न करणार,” असे स्पष्ट उत्तर देऊन सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

राहुल मोदी आणि श्रद्धाचे नाते
गेल्या काही वर्षांपासून श्रद्धा कपूरचे नाव प्रसिद्ध पटकथालेखक राहुल मोदीसोबत जोडले जात आहे. 2024 मध्ये या दोघांच्या डेटिंगच्या चर्चांना उधाण आले होते, जेव्हा त्यांना अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग कार्यक्रमात एकत्र पाहिले गेले. मधल्या काळात त्यांच्या ब्रेकअपच्या अफवा सुद्धा पसरल्या होत्या, परंतु 2025 मध्ये पुन्हा एकदा हे जोडपे एकत्र दिसल्याने चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. श्रद्धाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर राहुलसोबतचा फोटो शेअर करून आणि त्याला टॅग करून आपल्या नात्याची अप्रत्यक्ष कबुली यापूर्वीच दिली आहे.

हेही वाचा – BMC Elections 2026 : हलगर्जीपणाचा कळस! प्रचारावेळी बिल्डिंगला आग लागताच जीव धोक्यात टाकून पळ काढणाऱ्या कार्यकर्त्यांवर अभिनेत्री संतापली

कोण आहे राहुल मोदी?
श्रद्धाच्या आयुष्यातील ही खास व्यक्ती म्हणजेच राहुल मोदी हा बॉलिवूडमधील एक यशस्वी लेखक आणि सहाय्यक दिग्दर्शक आहे. ‘प्यार का पंचनामा 2’, ‘सोनू के टिटू की स्वीटी’ आणि ‘तू झुठी मैं मक्कार’ यांसारख्या सुपरहिट चित्रपटांच्या पटकथा लेखनात त्याचा मोलाचा वाटा आहे. ‘तू झुठी मैं मक्कार’ या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यानच राहुल आणि श्रद्धाची भेट झाली होती. विशेष म्हणजे, राहुल (35 वर्षे) हा श्रद्धा कपूर (38 वर्षे) पेक्षा वयाने 3 वर्षांनी लहान आहे.

भूतकाळातील नाती आणि भविष्यातील योजना
श्रद्धा कपूरचे नाव याआधी फरहान अख्तर, आदित्य रॉय कपूर आणि फोटोग्राफर रोहन श्रेष्ठा यांच्याशी जोडले गेले होते, मात्र कोणतीही चर्चा लग्नापर्यंत पोहोचली नव्हती. आता राहुल मोदीच्या कुटुंबाची सून होण्यासाठी श्रद्धा सज्ज असल्याचे तिच्या सोशल मीडिया कमेंटवरून दिसून येतेय. श्रद्धा सध्या मराठी लावणी कलाकार विठाबाई नारायणगावकर यांच्या ‘ईठा’ या बायोपिकच्या चित्रीकरणात व्यग्र असून, हे काम पूर्ण झाल्यानंतर ती लग्नाच्या बेडीत अडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हेही वाचा – RanapatiShivray Swari Agra : इतिहासप्रेमींसाठी खास भेट! शिवरायांच्या ऐतिहासिक आग्रा भेटीचा अध्याय लवकरच मोठ्या पडद्यावर

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number