Mangesh Kalokhe Death Case : ‘सुनील तटकरे रायगडचा ‘आका’, काळोखे हत्याकांडानंतर शिंदेंच्या आमदाराचा खळबळजनक आरोप

आमदार महेंद्र थोरवे यांनी मंगेश काळोखे यांच्या हत्येचा संबंध थेट सुनील तटकरे यांच्याशी जोडला आहे. थोरवे यांच्या दाव्यानुसार, मुख्य आरोपी रवींद्र देवकर याने..

Mangesh Kalokhe Death Case : ‘सुनील तटकरे रायगडचा ‘आका’,  काळोखे हत्याकांडानंतर शिंदेंच्या आमदाराचा खळबळजनक आरोप

Raigad Politics : रायगड जिल्ह्यातील खोपोली येथे शिवसेना नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांची भरचौकात निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून, सत्ताधारी महायुतीमधील दोन पक्षांमधील संघर्ष आता टोकाला पोहोचला आहे. शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांनी या प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांच्यावर थेट आणि गंभीर आरोप केले आहेत.

सुतारवाडीत हत्येचा कट रचल्याचा आरोप
आमदार महेंद्र थोरवे यांनी मंगेश काळोखे यांच्या हत्येचा संबंध थेट सुनील तटकरे यांच्याशी जोडला आहे. थोरवे यांच्या दाव्यानुसार, मुख्य आरोपी रवींद्र देवकर याने हत्येच्या 4 ते 5 दिवस आधी सुतारवाडी येथे जाऊन सुनील तटकरे यांची भेट घेतली होती. याच भेटीत काळोखेंचा काटा काढण्याचा कट रचला गेला, असा खळबळजनक आरोप त्यांनी केला आहे. "सुनील तटकरे यांनी रायगडमध्ये रक्तरंजित राजकारण सुरू केले असून तेच या जिल्ह्याचे 'आका' आहेत," अशा जहाल शब्दांत थोरवे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सांत्वनपर भेट
या धक्कादायक घटनेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी खोपोलीत जाऊन काळोखे कुटुंबाची भेट घेतली. शिंदे यांची भेट घेताच काळोखे कुटुंबाला अश्रू अनावर झाले. "आरोपींना फाशीची शिक्षा द्या आणि त्यांच्यावर 'मोका' लावा," अशी आर्त हाक पीडित कुटुंबाने उपमुख्यमंत्र्यांकडे दिली. यावेळी एकनाथ शिंदे यांनी कुटुंबाला धीर देत स्पष्ट शब्द दिला की, "आम्ही काळोखे कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. या प्रकरणातील एकाही दोषीला सोडले जाणार नाही, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल."

हेही वाचा – Mumbai Crime News: ChatGPT चा असाही वापर? तरुणाने AI च्या मदतीने बनवला बनावट रेल्वे पास; टीसीने 'असा' पकडला बनावटगिरीचा खेळ

राष्ट्रवादीच्या नेत्यांवर संशयाची सुई
नगरपालिका निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर काही दिवसांतच मंगेश काळोखे यांची हत्या झाली. यामागे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा हात असल्याचा आरोप शिवसेनेकडून केला जात आहे. सुधाकर घारे आणि रवींद्र देवकर यांनी पूर्ण नियोजन करून ही हत्या घडवून आणली आहे, असे थोरवे यांचे म्हणणे आहे. जोपर्यंत सुधाकर घारेसह सर्व 10 आरोपींना अटक होत नाही, तोपर्यंत पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशाराही आमदारांनी दिला आहे.

राजकीय वातावरणात तणाव
मंगेश काळोखे यांची हत्या राजकीय वैमनस्यातून झाल्याचे प्राथमिक चित्र दिसत आहे. एका बाजूला राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा नेतृत्व या प्रकरणात वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे, तर दुसरीकडे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पातळीवरून कारवाईचे आदेश दिले जात आहेत. रायगडमधील या घटनेमुळे आगामी काळात जिल्ह्यातील राजकीय समीकरणे आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न अधिक गंभीर होण्याची चिन्हे आहेत.

हेही वाचा – BMC Election 2026: मुंबई पालिका निवडणुकांसाठी AIMIM सज्ज; 7 उमेदवारांची पहिली यादी जाहीर

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number