Pune Seat Sharing Dispute : पुण्यातील जागावाटपावरून शिवसैनिक खवळले, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर कार्यकर्त्यांचा संताप

भाजप केवळ 15 जागा देण्यावर ठाम असल्याने शिवसेना (शिंदे गट) कार्यकर्त्यांचा संयम सुटला असून, त्यांनी थेट पक्षाच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांच्या पुण्यातील निवासस्थानाबाहेर जोरदार आंदोलन केले.

Pune Seat Sharing Dispute : पुण्यातील जागावाटपावरून शिवसैनिक खवळले, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर कार्यकर्त्यांचा संताप

Seat Sharing Dispute : पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत महायुतीमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे. भाजप केवळ 15 जागा देण्यावर ठाम असल्याने शिवसेना (शिंदे गट) कार्यकर्त्यांचा संयम सुटला असून, त्यांनी थेट पक्षाच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांच्या पुण्यातील निवासस्थानाबाहेर जोरदार आंदोलन केले. तुम्ही भाजपसमोर शरणागती पत्करली का? असा बोचरा सवाल करत शिवसैनिकांनी त्यांना धारेवर धरले आहे.

नेमका वाद काय?

पुणे महापालिकेच्या 227 जागांसाठी भाजप आणि शिवसेना यांच्यात जागावाटपाच्या अनेक फेऱ्या पार पडल्या. सूत्रांच्या माहितीनुसार, भाजपने शिवसेनेला 15 पेक्षा जास्त जागा देण्यास स्पष्ट नकार दिला आहे. पुण्यात फक्त 15 जणच लढण्यास सक्षम आहेत का? बाकी कार्यकर्त्यांनी काय करायचे? अशा शब्दांत इच्छुकांनी आपला संताप व्यक्त केला. नीलम गोऱ्हे यांच्या घरासमोर जमलेल्या कार्यकर्त्यांनी, "तुम्ही 15 जागांवर सेटल झालात का?" अशी विचारणा करत जोरदार घोषणाबाजी केली.

हेही वाचा – Prashant Jagtap : ठाकरेंची ऑफर नाकारून प्रशांत जगताप यांचा 'या' पक्षात अधिकृत प्रवेश

अर्ज भरण्याची मुदत जवळ येत असतानाही जागावाटपाचा तिढा सुटत नसल्याने इच्छुकांमध्ये अस्वस्थता आहे. भाजपच्या दबावापुढे न झुकता किमान 25 जागा मिळाव्यात, अशी आग्रही मागणी स्थानिक नेत्यांची आहे. हा पेच सोडवण्यासाठी शिवसेनेचे पुण्यातील प्रमुख नेते रविंद्र धंगेकर, आबा बागूल आणि अजय भोसले हे तातडीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी मुंबईला रवाना झाले आहेत.

हेही वाचा – BMC Election : 'अभिषेक घोसाळकरांचा मरणोत्तर..' तेजस्वी घोसाळकरांच्या पोस्टरमुळे दहिसरमध्ये वातावरण तापलं

महायुतीसमोर पेच

दरम्यान, भाजपची पुण्यातील ताकद मोठी असली तरी, शिवसेनेच्या अस्तित्वासाठी जास्तीत जास्त जागा लढवणे शिंदे गटासाठी प्रतिष्ठेचे बनले आहे. एकनाथ शिंदे भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाशी बोलून पुण्यातील कार्यकर्त्यांना न्याय देणार का? की भाजप आपल्या 'मोठ्या भावा'च्या भूमिकेवर ठाम राहणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number