Shiv Samvad Yatra: पंतप्रधानांच्या आवाहनाला शिवसेनेचा प्रतिसाद; श्रीकांत शिंदेंच्या ‘शिवसंवाद’ दौऱ्यात बाईक रॅली आणि ताफ्यांवर बंदी

खासदार श्रीकांत शिंदे यांचा 21 आणि 22 मे रोजी नाशिक व धुळे जिल्ह्यांत 'शिवसंवाद दौरा' आयोजित करण्यात आला आहे.

Shiv Samvad Yatra: पंतप्रधानांच्या आवाहनाला शिवसेनेचा प्रतिसाद; श्रीकांत शिंदेंच्या ‘शिवसंवाद’ दौऱ्यात बाईक रॅली आणि ताफ्यांवर बंदी

Shiv Samvad Yatra: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचत आणि सार्वजनिक वाहतुकीच्या वापराबाबत केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत शिवसेनेने एक आदर्श पाऊल उचलले आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांचा 21 आणि 22 मे रोजी नाशिक व धुळे जिल्ह्यांत ‘शिवसंवाद दौरा’ आयोजित करण्यात आला आहे. या दौऱ्यापूर्वी पक्षाने कार्यकर्त्यांसाठी कडक नियमावली जाहीर केली असून, दौऱ्यादरम्यान बाईक रॅली काढण्यास आणि वाहनांच्या मोठ्या ताफ्यांवर पूर्णपणे बंदी घातली आहे.

इंधन बचतीसाठी ‘कारपुलिंग’ आणि सामूहिक प्रवासावर भर
शिवसेनेने जारी केलेल्या अधिकृत परिपत्रकानुसार, पक्षाच्या बैठका आणि मेळाव्यांना उपस्थित राहताना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी वैयक्तिक वाहने आणण्याऐवजी ‘कारपुलिंग’ करावे किंवा एकाच वाहनातून एकत्रित प्रवास करावा, अशा सूचना दिल्या आहेत. 21 मे रोजी सिन्नर, चांदवड, निफाड, नांदगाव, येवला आणि मालेगाव येथे बैठका होतील; तर 22 मे रोजी बागलाण, साक्री, सिंदखेडा, शिरपूर आणि धुळे शहरात आढावा बैठकांचे नियोजन आहे. या सर्व ठिकाणी शक्तिप्रदर्शनासाठी केली जाणारी वाहनांची गर्दी टाळण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

हेही वाचा – Piyush Goyal Rickshaw Ride: पंतप्रधानांच्या आवाहनाला पियुष गोयल यांचा प्रतिसाद; मुंबईत रिक्षातून प्रवास करत दिला इंधन बचतीचा संदेश

सार्वजनिक वाहतूक आणि इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करण्याचे आवाहन
पक्षाने केवळ दौऱ्यापुरतेच मर्यादित न राहता, कार्यकर्त्यांना दैनंदिन जीवनातही सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणि इलेक्ट्रिक वाहनांचा (EVs) वापर करण्याची विनंती केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः प्रवासासाठी इलेक्ट्रिक वाहनाचा वापर सुरू केला असून आपल्या ताफ्यातील वाहनांची संख्याही कमी केली आहे. “पंतप्रधानांनी केलेले हे आवाहन राष्ट्रहिताचे असून, परकीय चलन वाचवण्यासाठी आणि पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी ते आवश्यक आहे,” असे मत शिंदे यांनी व्यक्त केले आहे.

पंतप्रधान मोदींचे ‘मिशन फ्युएल सेव्हिंग’
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 10 मे रोजी देशाला संबोधित करताना मेट्रो आणि सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढवण्याचे आवाहन केले होते. इंधनावरील अवलंबित्व कमी करून देशाचा खर्च वाचवणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. याच धर्तीवर आता शिवसेनेने आपल्या राजकीय कार्यक्रमांतून काटकसरीचा नवा पायंडा पाडण्यास सुरुवात केली असून, श्रीकांत शिंदे यांचा हा दौरा राजकीय प्रचारासोबतच पर्यावरण पूरक संदेश देणारा ठरणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number