Manisha Kaynde: मुंबईत शिंदेंची मोठी खेळी! ठाकरेंना शह देण्यासाठी रणनीती तयार; मनीषा कायंदेंनी सांगितला शिवसेनेचा मास्टप्लॅन

उत्तर मध्य आणि दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांची महत्त्वाची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत पक्ष संघटना मजबूत करणे आणि मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी विशेष रणनीती आखण्यात आली.

Manisha Kaynde: मुंबईत शिंदेंची मोठी खेळी! ठाकरेंना शह देण्यासाठी रणनीती तयार; मनीषा कायंदेंनी सांगितला शिवसेनेचा मास्टप्लॅन

Manisha Kaynde: आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने मुंबईत कंबर कसली आहे. उत्तर मध्य आणि दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांची महत्त्वाची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत पक्ष संघटना मजबूत करणे आणि मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी विशेष रणनीती आखण्यात आली. “एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना आज महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष बनली असून, आमचा स्ट्राईक रेट सर्वोत्तम आहे,” असा विश्वास प्रवक्त्या मनीषा कायंदे यांनी यावेळी व्यक्त केला.

प्रत्येक बुथवर ‘शिवदूत’; बीएलओ नियुक्तीवर विशेष लक्ष
निवडणूक आयोगामार्फत राबवल्या जाणाऱ्या मतदार पुनरीक्षण कार्यक्रमात शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. मनीषा कायंदे यांनी सांगितले की, प्रत्येक बुथवर पक्षाचे कार्यकर्ते कार्यान्वित केले जाणार आहेत. निवडणूक आयोगाकडून नेमल्या जाणाऱ्या बीएलओ (BLO) प्रक्रियेत पक्षाची काय जबाबदारी आहे आणि नवीन मतदारांची नोंदणी कशी करता येईल, याबाबत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. आगामी काळात होणारे मतदारसंघांचे सीमांकन (Delimitation) आणि महिला आरक्षणाची अंमलबजावणी लक्षात घेऊन पक्षाच्या सर्व आघाड्यांना कामाला लागण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

राहुल शेवाळेंच्या खांद्यावर मुंबईची धुरा
या मोहिमेचे नेतृत्व माजी खासदार आणि पक्षाचे सरचिटणीस राहुल शेवाळे करणार आहेत. दक्षिण मध्य आणि उत्तर मध्य या दोन्ही लोकसभा मतदारसंघाचे संपर्क प्रमुख म्हणून राहुल शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही संपूर्ण मोहीम राबवली जाणार आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना, महिला आघाडी आणि शिवसेनेचे मुख्य अंग अधिक आक्रमकपणे मैदानात उतरणार असल्याचे कायंदे यांनी स्पष्ट केले. या बैठकीला हजारोंच्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते, ज्यामुळे आगामी महापालिका आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी शिंदेंनी ठाकरेंना शह देण्यासाठी मोठी खेळी खेळल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number