Bharat Gogawale Cash Video : शिंदेंच्या अडचणी वाढल्या, आधी महेंद्र दळवी आता गोगावलेंचा व्हिडीओ समोर, 2 नेत्यांवर कॅश बॉम्बचा आरोप

रायगड येथून एक मोठी बातमी समोर येत आहे. शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांचा व्हिडिओ चर्चेत असतानाच, आता त्याच पक्षाचे मंत्री भरत गोगावले यांचाही नोटांच्या बंडलासोबतचा व्हिडिओ समोर आला आहे.

Bharat Gogawale Cash Video : शिंदेंच्या अडचणी वाढल्या, आधी महेंद्र दळवी आता गोगावलेंचा व्हिडीओ समोर, 2 नेत्यांवर कॅश बॉम्बचा आरोप

Bharat Gogawale Cash Bundle : आधी महेंद्र दळवी आणि आता भरत गोगावले यांचा नोटांच्या बंडलासह व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे शिंदे गटाच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. महेंद्र दळवींच्या (Mahendra Dalvi) कॅश प्रकरणानंतर आता मंत्री भरत गोगावलेंचाही (Bharat Gogawale) नोटांच्या बंडलासोबतचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामुळे अधिवेशन काळात शिंदे गटाच्या अडचणींत वाढ झाली आहे.

रायगड येथून एक मोठी बातमी समोर येत आहे. शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांचा व्हिडिओ चर्चेत असतानाच, आता त्याच पक्षाचे मंत्री भरत गोगावले यांचाही नोटांच्या बंडलासोबतचा व्हिडिओ समोर आला आहे. शेतकरी कामगार पक्षाच्या प्रवक्त्या चित्रलेखा पाटील (Chitralekha Patil) यांनी हा व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. त्यामुळे सध्या विधानमंडळाचे अधिवेशन सुरू असताना शिंदे गटाच्या अडचणीत वाढ झाल्याचे स्पष्ट दिसत आहे.

एकापाठोपाठ दोन मंत्र्यांचे प्रकरण समोर
याआधी, ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांचा नोटांसह असलेला व्हिडिओ समोर आणला होता. हे प्रकरण जोरदार चर्चेत असतानाच, आता त्यांच्याच पक्षाचे ज्येष्ठ मंत्री भरत गोगावले यांचाही नोटांच्या बंडलासोबतचा व्हिडिओ समोर आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. लोकप्रतिनिधींच्या अशा प्रकारच्या व्हिडीओमुळे सत्ताधारी पक्षावर टीका होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – ED Raids: बारामती पुन्हा ईडीच्या रडारवर; दुग्ध व्यवसायात शेकडो कोटींचा गैरव्यवहार

चित्रलेखा पाटील यांची मागणी
शेतकरी कामगार पक्षाच्या राज्य प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी या दोन्ही प्रकरणांवरून थेट गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी आमदार महेंद्र दळवी यांच्यावर पुन्हा एकदा आरोप करताना, केंद्र आणि राज्य शासनाने सीबीआय (CBI), ईडी (ED) आणि अँटी करप्शन ब्युरो (ACB) कडून या प्रकरणांची सखोल चौकशी करावी, अशी मागणी केली आहे. या दोन्ही व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या नोटा कुठून आल्या, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

'50 खोके'च्या वादाचा संदर्भ
चित्रलेखा पाटील यांनी यावेळी आणखी काही संबंधित मुद्दे मांडले. त्यांनी म्हटले की, दळवी हे सर्वाधिक गुन्हे असलेले आमदार आहेत. गेल्या वेळी त्यांच्या पत्नीचा व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये त्यांनी ‘50 खोके’ चा उल्लेख केला होता. तेव्हा 'कॅशबॉम्ब'वाल्यांची पत्नी माझ्यावर धावत आली होती. आता त्यांच्या पतीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे, असे चित्रलेखा पाटील म्हणाल्या. यामुळे नोटांच्या राजकारणावरून सुरू असलेल्या वादाला अधिक धार आली आहे.

हेही वाचा – Bhandara Crime News: धमकीप्रकरणी बच्चू कडूंचा नेता गोत्यात, नेमकं प्रकरण काय?

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number