Viral Story : उंदीर मारण्याचं औषध मागवलं…पण डिलीव्हरी बॉयच्या ‘या’ कृत्यामुळे वाचला महिलेचा जीव

संबंधित महिलेने रात्री उशिरा उंदीर मारण्याच्या विषाची (Rat Poison) तीन पाकिटे ऑर्डर केली होती. ऑर्डर घेऊन दिलेल्या पत्त्यावर पोहोचल्यावर रायडरला काहीतरी अघटित घडत असल्याचा संशय आला.

Viral Story : उंदीर मारण्याचं औषध मागवलं…पण डिलीव्हरी बॉयच्या ‘या’ कृत्यामुळे वाचला महिलेचा जीव

Blinkit Delivery Rider : तामिळनाडूमध्ये एका ब्लिंकिट डिलिव्हरी रायडरने आपल्या कर्तव्याच्या पलीकडे जाऊन माणुसकीचे दर्शन घडवत एका महिलेचा जीव वाचवला आहे. या रायडरने केवळ ऑर्डर डिलिव्हर न करता एका त्रस्त महिलेचे सांत्वन केले आणि महिलेचा जीव वाचवला. ज्याचे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे. संबंधित महिलेने रात्री उशिरा उंदीर मारण्याच्या विषाची (Rat Poison) तीन पाकिटे ऑर्डर केली होती. ऑर्डर घेऊन दिलेल्या पत्त्यावर पोहोचल्यावर रायडरला काहीतरी अघटित घडत असल्याचा संशय आला. घरचा दरवाजा उघडताच समोरची महिला प्रचंड रडत असल्याचे आणि मानसिक तणावात असल्याचे त्याच्या निदर्शनास आले.

हेही वाचा – Viral Story : ‘आईला आश्रयस्थानात सोडून कामावर ये…’, कर्मचाऱ्याला मॅनेजरचा अजब सल्ला, सोशल मिडीयावर संताप

महिलेची भावनिक स्थिती पाहून रायडरने तिला ती ऑर्डर न देण्याचा धाडसी निर्णय घेतला. “तुमची समस्या काहीही असो, कृपया टोकाचे पाऊल उचलून जीवन संपवू नका, जीवन खूप मौल्यवान आहे,” अशा शब्दांत त्याने तिचे सांत्वन केले. महिलेने जीवन संपवण्याचा विचार नाकारला असला तरी, रात्रीच्या वेळी विषाची तीन पाकिटे मागवणे संशयास्पद वाटल्याने त्याने ती ऑर्डर रद्द केली आणि तो विष स्वतःसोबत परत घेऊन गेला. त्याने या घटनेचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या. “आज मला काहीतरी मोठे साध्य केल्यासारखे वाटते आहे,” असे त्याने या व्हिडिओमध्ये म्हटले आहे.

हेही वाचा – MRP Violation: 20 रुपयांच्या पाण्याच्या बाटलीसाठी जास्त पैसे आकारले…; रेस्टॉरंटला मोठा भुर्दंड, ग्राहक आयोगाची कारवाई

या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी या रायडरवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. अनेकांनी त्याला ‘खरा हिरो’, ‘सुपर अण्णा’ आणि ‘सुपर थलैवा’ अशा पदव्या दिल्या आहेत. नियमांपेक्षा विवेकाला महत्त्व देऊन एका व्यक्तीचा जीव वाचवणाऱ्या या रायडरच्या प्रसंगावधानामुळे जगभरातून त्याच्यावर अभिमानाची थाप पडत आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number