Asaduddin Owaisi: ‘तिचा HR शी संबंधच नव्हता…’; निदा खानची असदुद्दीन ओवेसींकडून पाठराखण

नाशिक TCS प्रकरणातील मुख्य संशयित निदा खान हिला 42 दिवसांच्या फरारीनंतर अटक करण्यात आल्यावर एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी तिची जोरदार पाठराखण केली आहे.

Asaduddin Owaisi: ‘तिचा HR शी संबंधच नव्हता…’; निदा खानची असदुद्दीन ओवेसींकडून पाठराखण

Asaduddin Owaisi: नाशिकमधील बहुचर्चित टीसीएस लैंगिक शोषण आणि धर्मांतरण प्रकरणाला आता राजकीय वळण लागले आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित निदा खान हिला 42 दिवसांच्या फरारीनंतर अटक करण्यात आल्यावर एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी तिची जोरदार पाठराखण केली आहे. “हा प्रकार सुशिक्षित मुस्लिम तरुणांना लक्ष्य करण्यासाठी रचलेला एक राजकीय कट आहे,” असा खळबळजनक आरोप ओवेसी यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केला.

ओवेसी नेमकं काय म्हणाल? 
दरम्यान, ओवेसी म्हणाले की, आरोप सिद्ध होण्यापूर्वीच निदा खानला दोषी ठरवून तिची ‘मिडिया ट्रायल’ सुरू आहे. तक्रारदार व्यक्ती एका राजकीय पक्षाशी संबंधित असून केवळ द्वेषातून हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ‘निदा खान ही एचआर विभागात कामच करत नव्हती,’ असा दावा ओवेसी यांनी केला. तसेच तक्रार दाखल होण्यापूर्वीच तिची बदली झाली होती, त्यामुळे कंपनीतील घडामोडींशी तिचा संबंध जोडणे चुकीचे आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

बुरखा आणि धार्मिक पुस्तकांवर सवाल 
पोलिसांनी निदाच्या घरातून बुरखा, नकाब आणि धार्मिक पुस्तक जप्त केल्याचा उल्लेख एफआयआरमध्ये केला आहे. यावर संताप व्यक्त करताना ओवेसी म्हणाले, “एखाद्याच्या घरात बुरखा किंवा धार्मिक पुस्तक मिळणे हा गुन्हा कधीपासून झाला? हे साहित्य आक्षेपार्ह कसे असू शकते?”

हेही वाचा – Gunratna Sadavarte: ‘जरांगेंना आमदारकी देणारा पक्ष कोसळेल…’; गुणरत्न सदावर्ते यांचा घणाघात

‘न्यायालयावर आमचा पूर्ण विश्वास’
ओवेसी यांनी अलाहाबाद आणि दिल्लीतील जुन्या प्रकरणांचे दाखले देत सांगितले की, यापूर्वीही उर्दू साहित्य किंवा कवितांसाठी तरुणांना अडकवण्यात आले होते, मात्र कोर्टाने त्यांची निर्दोष मुक्तता केली. “निदा खान निर्दोष सुटेल याची आम्हाला खात्री आहे. सत्ताधारी पक्षाच्या दबावाखाली हे सर्व सुरू असले तरी कायद्याच्या लढाईत सत्य बाहेर येईल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

नेमकं प्रकरण काय?
नाशिकमधील टीसीएस कंपनीत लैंगिक छळ आणि सक्तीने धर्मांतरण केल्याचा आरोप निदा खानवर आहे. नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी संयुक्त मोहीम राबवून तिला ताब्यात घेतले. तथापी, नाशिक सत्र न्यायालयाने निदा खानला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून सध्या ‘एसआयटी’ (SIT) तिची कसून चौकशी करत आहे. या प्रकरणात आतापर्यंत ९ गुन्हे दाखल झाले असून, धार्मिक भावना दुखावल्याचा ठपकाही तिच्यावर ठेवण्यात आला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number