Bank Account Money Credit: बॅलन्स तपासला अन् अकाउंटमध्ये दिसले 9,99,49,586 रुपये, महिलेसोबत घडला धक्कादायक प्रकार

या महिलेच्या 'बँक ऑफ इंडिया'च्या खात्यात अचानक तब्बल 9 कोटी 99 लाख 49 हजार 586 रुपये जमा झाल्याचे दिसून आले. या प्रकारामुळे केवळ ते कुटुंबच नव्हे, तर संपूर्ण बँकिंग प्रशासनही चक्रावून गेले आहे.<br/>

Bank Account Money Credit: बॅलन्स तपासला अन् अकाउंटमध्ये दिसले  9,99,49,586 रुपये, महिलेसोबत घडला धक्कादायक प्रकार

Bank Account Money Credit: उत्तर प्रदेशातील मैनपुरी जिल्ह्यातून एक अजब आणि थक्क करणारी घटना समोर आली आहे. आपले दैनंदिन काम म्हणून बँकेतील शिल्लक (बॅलन्स) तपासण्यासाठी गेलेल्या एका महिलेला नियतीने असा काही धक्का दिला की, तिच्या पायाखालची जमीनच सरकली. या महिलेच्या 'बँक ऑफ इंडिया'च्या खात्यात अचानक तब्बल 9 कोटी 99 लाख 49 हजार 586 रुपये जमा झाल्याचे दिसून आले. या प्रकारामुळे केवळ ते कुटुंबच नव्हे, तर संपूर्ण बँकिंग प्रशासनही चक्रावून गेले आहे.

बॅलन्स पाहताच कुटुंबाची उडाली झोप
सीता नावाच्या या महिलेचे खाते बँक ऑफ इंडियाच्या शाखेत आहे. तिचा मुलगा अरुण कुमार हा एटीएमवर पिन (PIN) तयार करण्यासाठी आणि खात्यातील शिल्लक तपासण्यासाठी गेला होता. अरुणने मशीनच्या स्क्रीनवर जेव्हा आपला बॅलन्स पाहिला, तेव्हा त्याला आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. तिथे साधारण 10 कोटी रुपयांची रक्कम दिसत होती. "आम्ही फक्त बॅलन्स चेक करायला गेलो होतो, पण तिथे एवढी मोठी रक्कम कुठून आली, याबद्दल आम्हाला काहीच कल्पना नाही," असे महिलेने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

"हे पैसे आमचे नाहीत"; कुटुंबाचा प्रामाणिकपणा
एकीकडे एवढी मोठी रक्कम पाहून कोणाचाही मोह सुटला असता, मात्र सीता यांच्या कुटुंबाने कमालीचा प्रामाणिकपणा दाखवला आहे. सीता यांचे पती फरझान यांनी स्पष्ट केले की, त्यांचे कुटुंब शेती करून आपला उदरनिर्वाह करते आणि या अफाट पैशांवर त्यांचा कोणताही कायदेशीर हक्क नाही. "हे पैसे ज्यांचे असतील त्यांनी ते परत घेऊन जावेत, बँक उघडताच आम्ही स्वतः तिथे जाऊन ही सर्व रक्कम परत करू," अशी भूमिका या कुटुंबाने घेतली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

हेही वाचा – LPG संकटात भारताला या दूरच्या मित्राचा मदतीचा हात; होर्मुज बंद झाल्याने नव्या पर्यायांचा शोध

बँकेचे स्पष्टीकरण आणि तांत्रिक बिघाड
या खळबळजनक घटनेनंतर 'बँक ऑफ इंडिया'च्या सुलतानपूर शाखेतील अधिकाऱ्यांनी आपली बाजू मांडली आहे. बँकेच्या मते, हा सर्व प्रकार एका 'तांत्रिक बिघाडामुळे' घडला असावा. शाखा व्यवस्थापकांनी माहिती दिली की, संबंधित महिलेचे बँकेत आधीपासूनच एक सक्रिय कर्ज खाते अस्तित्वात आहे. काही तांत्रिक त्रुटीमुळे ही रक्कम खात्यात दिसत असावी. बँक प्रशासन आता या प्रकरणाची सखोल चौकशी करत असून ही त्रुटी लवकरच दूर केली जाईल, असे आश्वासन देण्यात आले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number