Jantar Mantar Protest: शरद पवारांनी गाठलं जंतर-मंतर मैदान; आंदोलक अभिजित दीपके यांच्याशी चर्चा करून सरकारवर डागली तोफ

आदल्या दिवशी पोलिसांनी केलेल्या बळप्रयोगामुळे परिस्थिती चिघळलेली असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) अध्यक्ष शरद पवार यांनी स्वतः आंदोलनस्थळी जाऊन मुख्य आंदोलक अभिजित दीपके यांची भेट घेतली

Jantar Mantar Protest: शरद पवारांनी गाठलं जंतर-मंतर मैदान; आंदोलक अभिजित दीपके यांच्याशी चर्चा करून सरकारवर डागली तोफ

Jantar Mantar Protest: राजधानी दिल्लीतील जंतर-मंतर मैदानावर चाललेल्या आंदोलनाला आता देशातील बड्या राजकीय नेत्यांचे थेट बळ मिळत आहे. आदल्या दिवशी पोलिसांनी केलेल्या बळप्रयोगामुळे परिस्थिती चिघळलेली असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) अध्यक्ष शरद पवार यांनी स्वतः आंदोलनस्थळी जाऊन मुख्य आंदोलक अभिजित दीपके यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांवर झालेल्या कारवाईची सविस्तर माहिती घेतली आणि आंदोलकांच्या पुढील भूमिकेविषयी चर्चा केली.

4 प्रमुख मागण्या आणि 31 दिवसांचा संघर्ष; अभिजित दीपके यांचा पवारांकडे पाढा
भेटीदरम्यान अभिजित दीपके यांनी गेल्या 31 दिवसांपासून सुरू असलेल्या संघर्षाचा पाढा शरद पवारांसमोर वाचला. सोनम वांगचुक यांना नजरकैदेत ठेवल्याचा आरोप करत आंदोलकांनी सरकारसमोर 4 प्रमुख मागण्या ठेवल्या आहेत:

– केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ राजीनामा द्यावा.
– आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर दिल्ली व मुंबईत दाखल केलेले सर्व गुन्हे (FIR) मागे घेण्यात यावेत.
– टोकाचं पाऊल उचललेल्या पीडित विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना प्रत्येकी 1 कोटी रुपयांची आर्थिक मदत मिळावी.
– सोनम वांगचुक यांची लवकरात लवकर सुटका केली जावी.

एखाद्या खाजगी कंपनीत 1-2 चुका झाल्यानंतर कर्मचाऱ्याला कामावरून काढून टाकले जाते, मात्र लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लावणारा पेपर लीक होऊनही शिक्षणमंत्र्यांवर कोणतीही कारवाई होत नाही, असा संतप्त सवाल दीपके यांनी पवारांशी बोलताना उपस्थित केला.

महाराष्ट्रातील 30 जिल्ह्यांत पडसाद; शरद पवारांचा सहकार्याचा हात
दरम्यान, शरद पवार यांनी आंदोलकांची आस्थेने चौकशी करत केली. तसेच मदत लागल्यास सहकार्याची भावना व्यक्त केली. यावेळी शरद पवार म्हणाले की, कोणत्याही अधिकृत आवाहनाशिवाय महाराष्ट्रातील तब्बल 30 प्रमुख जिल्ह्यांमध्ये या आंदोलनाचे उत्स्फूर्त पडसाद उमटले आहेत. तथापि, कालच्या पोलीस कारवाईमुळे लोकांमध्ये सरकारविरोधात प्रचंड रोष निर्माण झाल्याचे दीपके यांनी त्यांना सांगितले.

हेही वाचा – Uddhav Thackeray: राहुल गांधींच्या आंदोलनानंतर उद्धव ठाकरेंची मोठी चाल; विद्यार्थ्यांच्या समर्थनासाठी उद्या दिल्ली दौरा

विरोधी पक्षांची एकजूट; ठाकरे गट, मनसे आणि काँग्रेसचा पाठिंबा
NEET आणि पेपरफुटी प्रकरणावरून पेटलेल्या या आंदोलनाला विरोधी पक्षांनी पूर्ण ताकदीने पाठिंबा दिला आहे. यापूर्वी मनसे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने या लढ्याला पाठिंबा जाहीर केला असून खासदार संजय राऊत यांनीही जंतर-मंतरवर जाऊन भेट घेतली होती. दुसरीकडे, काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी थेट पंतप्रधान निवासाबाहेर ठिय्या आंदोलन सुरू केल्याने या आंदोलनाची धग आता संपूर्ण देशात पसरली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number