Harshvardhan Sapkal: ‘शेम ऑन यू पंत!’; जुन्या ट्वीटवरून हर्षवर्धन सपकाळांचा फडणवीसांवर घणाघात, महिला आरक्षणावरून नवा वाद

मतदारसंघ पुनर्रचनेचा भाजपचा प्रयत्न विरोधकांनी हाणून पाडल्याचा दावा केला जात असतानाच, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.

Harshvardhan Sapkal: ‘शेम ऑन यू पंत!’; जुन्या ट्वीटवरून हर्षवर्धन सपकाळांचा फडणवीसांवर घणाघात, महिला आरक्षणावरून नवा वाद

Harshvardhan Sapkal: महिला आरक्षण विधेयकाच्या मुद्द्यावरून सत्ताधारी भाजप आणि विरोधी पक्षांमध्ये सध्या जोरदार वाकयुद्ध रंगले आहे. मतदारसंघ पुनर्रचनेचा भाजपचा प्रयत्न विरोधकांनी हाणून पाडल्याचा दावा केला जात असतानाच, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर ‘खोटारडेपणा’चा आरोप करत थेट हल्लाबोल केला आहे. फडणवीसांचे 2023 मधील एक जुने ट्वीट शेअर करत सपकाळांनी त्यांना आरसा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.

नेमका वाद काय?
सध्या ‘नारी शक्ती वंदन विधेयक’ नामंजूर झाल्याचा आरोप करत भाजप आक्रमक झाली आहे. मात्र, विरोधकांच्या मते हे विधेयक 3 वर्षांपूर्वीच म्हणजे 2023 मध्ये त्यांच्या पाठिंब्याने मंजूर झाले होते. भाजप केवळ ‘मतदारसंघ पुनर्रचना विधेयक’ फेटाळल्याचा राग महिला आरक्षणाच्या नावाखाली काढत असल्याचा दावा काँग्रेसने केला आहे.

“शेम ऑन यू पंत!”
हर्षवर्धन सपकाळ यांनी फडणवीसांवर निशाणा साधताना म्हटले की, “हा पहा मुख्यमंत्र्यांचा खोटारडेपणा! महिलांना आरक्षण देणारे विधेयक 2023 मध्येच पारित झाले होते, तेव्हा फडणवीसांनी विरोधकांचा उल्लेखही न करता केवळ पंतप्रधानांचे आभार मानले होते. आज लोकसभेने केवळ ‘मतदारसंघ पुनर्रचना विधेयक’ फेटाळले आहे, पण मुख्यमंत्री जाणीवपूर्वक महिला आरक्षण नामंजूर झाल्याचा कांगावा करत आहेत. शेम ऑन यू पंत!”

फडणवीसांचे ‘ते’ जुने ट्वीट काय होते?
ज्या ट्वीटचा हवाला सपकाळांनी दिला आहे, त्यात देवेंद्र फडणवीस यांनी 2023 मध्ये म्हटले होते की, “ऐतिहासिक क्षण! लोकसभेने महिला आरक्षण विधेयकाला 454 मतांच्या बहुमताने मंजुरी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारने घेतलेला हा एक क्रांतीकारी निर्णय आहे.” या ट्वीटमध्ये त्यांनी नारी शक्तीचे अभिनंदन करत पंतप्रधानांचे आभार मानले होते.

हेही वाचा – Census 2026: महाराष्ट्रात जनगणनेला होणार सुरूवात; जिल्हा परिषदेच्या बदल्यांना स्थगिती, तर शिक्षकांच्या उन्हाळी सुट्ट्याही रद्द

राजकारणात खळबळ
एककीडे भाजप याला ‘नारी शक्तीचा अवमान’ म्हणत रस्त्यावर उतरली आहे, तर दुसरीकडे काँग्रेसने जुन्या कागदपत्रांचा आणि ट्वीट्सचा आधार घेत भाजपचा दावा खोडून काढला आहे. सपकाळांच्या या ‘पंत’ उल्लेखामुळे आणि थेट टीकेमुळे राज्यातील राजकीय वातावरण अधिकच तापण्याची चिन्हे आहेत.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number