Devendra Fadanvis – Amit Shah Meeting : दिल्लीत शाह-फडणवीसांमध्ये 3 तास खलबतं; ‘या’ दोन मोठ्या मुद्द्यांवर ठरली रणनीती

ही मुख्य बैठक आटोपल्यावर शाहा आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात तब्बल 3 तास स्वतंत्र चर्चा झाली.

Devendra Fadanvis – Amit Shah Meeting : दिल्लीत शाह-फडणवीसांमध्ये 3 तास खलबतं; ‘या’ दोन मोठ्या मुद्द्यांवर ठरली रणनीती

Delhi Meeting: केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांच्या उपस्थितीत दिल्लीत पार पडलेल्या नर्मदा प्रकल्प बैठकीनंतर एक महत्त्वाची राजकीय घडामोड घडली. ही मुख्य बैठक आटोपल्यावर शाहा आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात तब्बल 3 तास स्वतंत्र चर्चा झाली. मंगळवारी संध्याकाळी 7 ते रात्री 10 या वेळेत झालेल्या या गुप्त बैठकीत महाराष्ट्र तसेच देशातील आगामी राजकीय समीकरणांवर सविस्तर मंथन झाले. या वेळी राज्यातील भाजपची पुढील दिशा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा संभाव्य विस्तार आणि राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्रातील नेत्यांना मिळणारे प्रतिनिधित्व या 2 प्रमुख मुद्द्यांवर दोन्ही नेत्यांनी रणनीती आखली. सूत्रांनुसार, या बैठकीनंतर तूर्तास महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कोणताही फेरबदल होणार नसल्याचे निश्चित झाले आहे. दरम्यान, शहा यांनी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्याशीही स्वतंत्रपणे चर्चा केली.

दशकांपासून प्रलंबित असलेल्या नर्मदा वादावर ऐतिहासिक तोडगा
याआधी दिल्लीत अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली नर्मदा प्रकल्पा संदर्भात हाय-प्रोफाइल बैठक पार पडली. या महत्त्वपूर्ण बैठकीला देवेंद्र फडणवीस, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांच्यासह मध्य प्रदेशचे मुख्य सचिव अनुराग जैन, अतिरिक्त मुख्य सचिव नीरज मंडलोई आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. अनेक दशकांपासून प्रलंबित असलेल्या नर्मदा नदीच्या पाणीवाटपाचा प्रश्न, प्रकल्पबाधितांचे पुनर्वसन आणि जमिनीच्या मोबदल्याची नुकसानभरपाई या क्लिष्ट मुद्द्यांवर या बैठकीत सर्व राज्यांमध्ये ऐतिहासिक आणि महत्त्वपूर्ण सहमती झाली आहे.

हेही वाचा – Maharashtra Cabinet Meeting : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी सुनावणीच्या पार्श्वभूमीवर आज महत्त्वाची बैठक; शरद पवारदेखील राहणार उपस्थित, तर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीकडेही लक्ष

शरद पवार गटाच्या महायुतीमधील प्रवेशाच्या चर्चांवर फडणवीसांचे पूर्णविराम
दरम्यान, भाजप नेते विनोद तावडे आणि शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यात मुंबईत झालेल्या एका गुप्त भेटीमुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या होत्या. शरद पवारांचा गट महायुती सरकारमध्ये सामील होणार असल्याच्या वावड्या उठल्या होत्या. 

मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना या सर्व शक्यता फेटाळून लावल्या. महाराष्ट्रात राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (NDA) आता कोणत्याही नवीन पक्षाचा समावेश केला जाणार नाही, सध्या जे पक्ष सोबत आहेत तेच पुढे राहतील, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, शरद पवार यांच्यासोबत असलेल्या कोणत्याही आमदार किंवा खासदाराला फोडण्याचा भाजपचा कोणताही प्रयत्न नसल्याचेही त्यांनी या वेळी ठामपणे सांगितले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number