Pune News : पुणेकरांसाठी महत्त्वाचे! उद्या शाळांना ‘हाफ डे’ तर 6000 कंपन्यांना सुट्टी; ‘या’ कारणामुळे घेण्यात आला निर्णय

पुणे महानगरपालिका क्षेत्रातील सर्व शाळांसाठी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी महत्त्वाचे आदेश जारी केले आहेत.

Pune News : पुणेकरांसाठी महत्त्वाचे! उद्या शाळांना ‘हाफ डे’ तर 6000 कंपन्यांना सुट्टी; ‘या’ कारणामुळे घेण्यात आला निर्णय

Pune Grand Challenge Tour : पुणे शहरात उद्या (शुक्रवार, 26 जानेवारी) 'पुणे ग्रँड चॅलेंज टूर' या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेचा चौथा टप्पा पार पडणार आहे. या मोठ्या क्रीडा इव्हेंटमुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात आले असून, सुरक्षिततेचा उपाय म्हणून शाळा आणि उद्योगांच्या वेळेत कपात करण्यात आली आहे. पुणे महानगरपालिका क्षेत्रातील सर्व शाळांसाठी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी महत्त्वाचे आदेश जारी केले आहेत. सायकल स्पर्धेचा समारोप बालगंधर्व रंगमंदिर परिसरात होणार असल्याने शहरातील मध्यवर्ती भागात प्रचंड गर्दी आणि वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी उद्या सर्व सरकारी आणि खासगी शाळांचे कामकाज फक्त दुपारी 12 वाजेपर्यंतच सुरू राहील. दुपारी 12 नंतर सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

भोसरी एमआयडीसीतील 6,000 कंपन्यांना शुक्रवारी सुट्टी 

पिंपरी-चिंचवडमधील भोसरी एमआयडीसी परिसरातून स्पर्धेचा मार्ग जाणार आहे. या मार्गावर खेळाडूंना अडथळा येऊ नये, म्हणून येथील लघुउद्योग संघटनेने मोठा निर्णय घेतला आहे. भोसरी एमआयडीसीतील उद्योगांची दर गुरुवारी असणारी साप्ताहिक सुट्टी रद्द करून ती शुक्रवारी (26 जानेवारी) देण्यात आली आहे. यामुळे सुमारे 6,000 छोटे-मोठे कारखाने उद्या बंद राहतील. महावितरणने देखील सहकार्य करत गुरुवारी होणारे देखभाल दुरुस्तीचे काम (शटडाऊन) उद्या शुक्रवारवर हलवले आहे. बालेवाडीपासून सुरू होणारी ही स्पर्धा 58 ते 75 किलोमीटरचा प्रवास करून बालगंधर्व रंगमंदिर येथे समाप्त होईल.

हेही वाचा – BMC Mayor: "आक्षेप घेण्याचा अधिकार आहे, पण केलेले आरोप … " राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांचे ठाकरे गटाला चोख प्रत्युत्तर

प्रमुख मार्ग आणि नागरिकांसाठी आवाहन 

दरम्यान, पिंपरी-चिंचवडमधील शाहूनगर, टेल्को रोड, स्पाईन सिटी चौक या भागातून खेळाडूंचा मार्ग असेल, तर पुणे शहरात बालेवाडी ते बालगंधर्व या दरम्यानच्या सर्व प्रमुख रस्त्यांवरील वाहतूक काही काळासाठी वळवण्यात येणार आहे. उद्या सायकल स्पर्धेचा समारोप असल्याने नागरिकांनी प्रवासाचे नियोजन करताना वळवलेल्या मार्गांचा विचार करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. विशेषतः पालकांनी शाळांच्या बदललेल्या वेळेची नोंद घ्यावी. सासवड ते बारामती दरम्यान आज तिसरा टप्पा सुरू असून, उद्या पुण्यात होणाऱ्या समारोपासाठी मोठी पोलीस सुरक्षा तैनात करण्यात आली आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number