SC Concerns on Whiskey Tetra Pack : सर्वोच्च न्यायालयात एका सुनावणीदरम्यान चक्क व्हिस्कीच्या बाटल्या आणि टेट्रापॅक (Tetra Pack) वकिलांनी सादर केल्यानंतर न्यायमूर्तींना आश्चर्य वाटले. यावेळी, व्हिस्की टेट्रा पॅकमध्ये मिळत असल्याचे पाहून न्यायमूर्तींनी नाराजी आणि गंभीर चिंताही व्यक्त केली. व्हिस्कीचे उत्पादन करणाऱ्या दोन बलाढ्य ब्रँड्समधील कॉपीराईट (Copyright) वादावर ही सुनावणी चालू होती. या प्रकरणादरम्यान न्यायमूर्तींनी टेट्रापॅकवर चिंता व्यक्त केली आणि “अशा गोष्टींना सरकार परवानगी कशी देते?” असा थेट सवाल उपस्थित केला.
सर्वोच्च न्यायालयात नेमके काय घडले?
जॉन डिस्टिलरीज (Original Choice) विरुद्ध अलायड ब्लेंडर्स अँड डिस्टिलरीज (Officers Choice) यांच्यातील खटल्यादरम्यान झालेले हे संभाषण सध्या चर्चेचा विषय ठरले आहे. जॉन डिस्टिलरीज ‘ओरिजिनल चॉईस’ (Original Choice) या व्हिस्की ब्रँडचे उत्पादन करते, तर अलायड ब्लेंडर्स ‘ऑफिसर्स चॉईस’ (Officers Choice) या ब्रँडचे. ‘ओरिजिनल चॉईस’ हे नाव ‘ऑफिसर्स चॉइस’सारखंच वाटत असल्यामुळे अलायड ब्लेंडर्सने कॉपीराईटचा दावा केला होता. न्यायमूर्ती सूर्य कांत आणि न्यायमूर्ती जॉयमलया बागची यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी चालू असताना सोमवारी बचावा पक्षाचे वकील मुकुल रोहतगी यांनी अचानक खटल्यातील पुरावा म्हणून न्यायालयासमोर चक्क व्हिस्कीच्या दोन बाटल्या आणि एक टेट्रापॅक ठेवला. यामुळे कोर्टात उपस्थित असलेल्या सगळेच जण अवाक् झाले.
Former Supreme Court judge Justice L Nageswara Rao is set to mediate a trademark dispute between India's leading whiskey-selling brands John Distilleries and Allied Blenders.
Read more: https://t.co/t6Ej4zViQR #SupremeCourt pic.twitter.com/ImQWcxnLII — Live Law (@LiveLawIndia) November 17, 2025
न्यायमूर्तींनी ‘टेट्रापॅक’वर व्यक्त केली चिंता
कॉपीराईटच्या मुद्द्यावर पुरावा म्हणून दोन्ही कंपन्यांच्या व्हिस्कीच्या बाटल्या आणि टेट्रापॅक सादर करताना रोहतगी यांनी न्यायालयाला सांगितले की, हे टेट्रापॅक स्वस्त असल्यामुळे त्यांची खरेदी जास्त होते. त्यावेळी न्यायमूर्ती सूर्य कांत यांनी या टेट्रापॅकबाबत गंभीर चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, “हे असं करण्याची परवानगी तरी दिली जाऊ शकते का? कारण शाळा-महाविद्यालयांमध्ये हे असे टेट्रापॅक घेऊन जाणं अतिशय सोपं आहे.” यावर वकील रोहतगी यांनी “हे असंच चालू आहे, त्यामुळेच त्यांचा खप इतका जास्त आहे,” असे स्पष्टीकरण दिले. यावर न्यायमूर्ती सूर्य कांत यांनी आश्चर्य व्यक्त करत “अशा प्रकारे टेट्रा पॅकमध्ये विकली जाणारी व्हिस्की मी पहिल्यांदाच पाहत आहे,” असे नमूद केले.
#CourtroomHumor: In a trademark dispute between 2 whiskey-selling brands, Sr Adv Mukul Rohatgi produces the products (bottles) in #SupremeCourt J Surya Kant: I hope inside [material] is not similar like [you are saying about] outside Rohatgi then produces tetra-packs in which… pic.twitter.com/kFc59xFF0E — Live Law (@LiveLawIndia) November 17, 2025
सरकार लोकांच्या आरोग्याशी खेळत आहे
यावेळी वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी सदर टेट्रापॅक व्हिस्कीचे असल्यासारखे अजिबात वाटत नाही आणि त्यावर कोणत्याही प्रकारची आरोग्यविषयक सूचनाही दिलेली नसते, अशी माहिती न्यायालयाला दिली. यावरही न्यायमूर्ती सूर्य कांत यांनी नाराजी व्यक्त केली आणि “मला कळत नाही की सरकार अशा प्रकारचे पॅकिंग वापरायची परवानगी कशी देत आहे?” असा सवाल केला. न्यायमूर्ती बागची यांनीही यावर तीव्र नाराजी व्यक्त करत “सरकार लोकांच्या आरोग्याशी खेळत आहे,” अशी टिप्पणी केली. दरम्यान, न्यायालयाने हा कॉपीराईट खटला मध्यस्थ (Mediator) म्हणून सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश एल. नागेश्वरा राव यांच्याकडे सोपवला आहे.