Sanjay Raut On Eknath Shinde: शिंदे गट अमित शाहांच्या जोड्यांची पूजा करणार; संजय राऊत यांचा एकनाथ शिंदेंवर खोचक शब्दांत निशाणा

या दसरा मेळाव्याला संबोधित करताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला.

Sanjay Raut On Eknath Shinde: शिंदे गट अमित शाहांच्या जोड्यांची पूजा करणार; संजय राऊत यांचा एकनाथ शिंदेंवर खोचक शब्दांत निशाणा

Sanjay Raut On Eknath Shinde: शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा दसरा मेळावा आज शिवाजी पार्क येथे पार पडत आहे. या दसरा मेळाव्याला संबोधित करताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. यावेळी संजय राऊत म्हणाले की, 'शस्त्र पूजन करण्याचा अधिकार हा फक्त हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनाच आहे. मला कोणातरी विचारलं की, मिंधे गट आज कशाची पूजा करणार? मी म्हटलं त्यांनी दिल्लीवर अमित शाहांचे जोडे आणले आहेत. ते अमित शाहांच्या चपलांची पूजा करणार आहेत.'

हेही वाचा – Uddhav Thackeray In Dasara Melava 2025 : 'कमळाबाईनी स्वतःचं कमळं फुलवलं, पण जनतेचा चिखल केला'; उद्धव ठाकरेंची खोचक टीका

संजय राऊत पुढे म्हणाले की, दसरा मेळावा चिखलात कसा घेणार? अशी अनेकांनी विचारणा केली. परंतु हा ओला दसरा मेळावा आहे आणि तो मेळावा शिवसेनेतून फुटून गेलेल्या गद्दारांच्या तोंडावर चिखल फेकून मारण्याचा उत्सव आहे. आपण शिवतीर्थावर उभे आहोत आणि येथून जवळच अजून एक शिवतीर्थ आहे ते देखील आपलेच मानायला हवे, असं सूचक वक्तव्यही संजय राऊत यांनी केलं आहे.

हेही वाचा – Manoj Jarange Patil Dasara Melava: मनोज जरांगे दसरा मेळाव्यात ढसाढसा रडले; म्हणाले, ‘मी संपूर्ण आयुष्य झिजवलं…’

दरम्यान, संजय राऊत यांनी सांगितलं की, भर पावसामध्ये चिखलामध्ये हजर असलेले निष्ठावंत शिवसैनिक आहे. 68 वर्षांपूर्वी शिवसेनाप्रमुखांनी जी ठिणगी टाकली आहे. ती ठिणगी मुसळधार पाऊस सुद्धा विझवू शकत नाही. मराठवाडा 8 दिवस पाण्यात आहे. आता आपल्याला 2 तास पाण्यात मेळावा घ्यावा लागला. त्यामुळे हा आपला ओला मेळावा आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number