Sanjay Raut : ‘भाजप गुंडांचा पक्ष म्हणणारे राघव चड्ढा..’ संजय राऊतांचा घणाघात; भाजपवर ‘वॉशिंग मशीन’ राजकारण म्हणत डागली तोफ

'कालपर्यंत भाजपला गुंडांची आणि भ्रष्टाचाऱ्यांची पार्टी म्हणणारे राघव चड्ढा आज त्याच पक्षात कसे सामील झाले?' असा जळजळीत सवाल राऊत यांनी केला.

Sanjay Raut : ‘भाजप गुंडांचा पक्ष म्हणणारे राघव चड्ढा..’ संजय राऊतांचा घणाघात; भाजपवर ‘वॉशिंग मशीन’ राजकारण म्हणत डागली तोफ

Sanjay Raut slams Raghav Chadha and BJP Washing Machine Politics : शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आम आदमी पार्टीला सोडून भाजपवासी झालेले नेते राघव चड्ढा यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. 'कालपर्यंत भाजपला गुंडांची आणि भ्रष्टाचाऱ्यांची पार्टी म्हणणारे राघव चड्ढा आज त्याच पक्षात कसे सामील झाले?' असा जळजळीत सवाल राऊत यांनी उपस्थित केला. राघव चड्ढा यांनी संसदेत आणि विविध मुलाखतींमध्ये भाजपवर वारंवार टीका केली होती; मात्र, आता त्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे त्यांच्या जुन्या वक्तव्यांची आठवण राऊत यांनी करून दिली आहे. भाजपचे राजकारण किती टोकाचे आहे, हेच यातून स्पष्ट होत असल्याचे राऊत म्हणाले.

भाजपच्या 'वॉशिंग मशीन' स्टाईलवर टीका
भाजपच्या कार्यपद्धतीवर टीका करताना संजय राऊत यांनी पुन्हा एकदा 'वॉशिंग मशीन'चा संदर्भ दिला. ज्या नेत्याने भाजपला गुंडांचा पक्ष म्हटले, त्यांनाच आपल्या पक्षात घेऊन भाजपने त्यांना पवित्र केले आहे का? असा उपरोधिक सवाल त्यांनी केला. भाजपमध्ये प्रवेश करताच नेत्यांवरील भ्रष्टाचाराचे किंवा गुन्हेगारीचे डाग कसे धुतले जातात, यावर राऊत यांनी कडाडून हल्ला केला. भाजपचे राजकारण हे 'निर्लज्ज' स्वरूपाचे असून सत्तेसाठी कोणत्याही थराला जाणारे आहे, अशी बोचरी टीका त्यांनी यावेळी केली.

हेही वाचा – Sunetra Pawar: सुनेत्रा पवार भावी मुख्यमंत्री? पुण्यात झळकलेल्या फलकांमुळे एकच खळबळ

स्वतःच्या संघर्षाची आठवण
राघव चड्ढा यांच्या पक्षप्रवेशाच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी स्वतःवर आलेल्या दबावाविषयीही सांगितले. 'माझ्यावरही पक्ष सोडण्यासाठी प्रचंड दबाव होता, परंतु मी पक्ष सोडण्यापेक्षा तुरुंगात जाणे पसंत केले,' असा खळबळजनक दावा राऊत यांनी केला. तत्त्वाशी तडजोड न करता संघर्षाचा मार्ग निवडल्याचा दावाही त्यांनी केला. 1 मे च्या आधीच राज्यातील राजकीय वातावरण या विधानांमुळे तापले असून, राऊत यांनी स्वतःच्या निष्ठेची तुलना राघव चड्ढा यांच्या बदललेल्या भूमिकेशी केली आहे.

राजकीय वर्तुळात खळबळ
संजय राऊत यांच्या या विधानांमुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. राघव चड्ढा यांच्यासारख्या तरुण आणि आक्रमक नेत्याने भाजपशी जुळवून घेतल्याने विरोधकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. भाजप गुंडांचा पक्ष होता मग आता अचानक तो पवित्र कसा झाला, या प्रश्नाने राऊत यांनी सत्ताधारी पक्ष आणि राघव चड्ढा यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रकरणावर 'आप' किंवा भाजपच्या वतीने अधिकृत प्रतिक्रिया काय येते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा – Raghav Chadha: भाजपामध्ये प्रवेश केला खरा पण तांत्रिक नियमांत 'आप'चे बंडखोर खासदार अडकणार; राघव चड्ढा अडचणीत येणार?

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number