Bihar New Cabinet Oath: बिहारमध्ये सम्राट चौधरी मंत्रिमंडळाचा विस्तार; निशांत कुमार यांच्यासह ‘या’ दिग्गज नेत्यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ

राजधानी पाटणा येथील गांधी मैदानावर आयोजित एका भव्य सोहळ्यात अनेक नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.

Bihar New Cabinet Oath: बिहारमध्ये सम्राट चौधरी मंत्रिमंडळाचा विस्तार; निशांत कुमार यांच्यासह ‘या’ दिग्गज नेत्यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ

Bihar New Cabinet Oath: बिहारच्या राजकीय वर्तुळात आज एक मोठी घडामोडी घडली असून मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार संपन्न झाला. राजधानी पाटणा येथील गांधी मैदानावर आयोजित एका भव्य सोहळ्यात अनेक नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. 15 एप्रिल रोजी सम्राट चौधरी यांनी अत्यंत मर्यादित स्वरूपात मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती, मात्र आज झालेल्या विस्तारामुळे हे सरकार आता पूर्ण क्षमतेने कार्यरत झाले आहे. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि एनडीएचे (NDA) सर्व प्रमुख नेते उपस्थित होते.

निशांत कुमार यांचे राजकारणात पदार्पण
या मंत्रिमंडळ विस्ताराचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे नितीश कुमार यांचे पुत्र निशांत कुमार यांनी घेतलेली मंत्रीपदाची शपथ. जेडी(यू) (JD-U) च्या कोट्यातून त्यांनी मंत्रिमंडळात प्रवेश केला आहे. सुरुवातीला राजकारणापासून दूर राहणाऱ्या निशांत यांच्या नावावर वडील नितीश कुमार यांनी संमती दिल्यानंतर, पक्षाच्या नेत्यांनी त्यांची मनधरणी केली आणि अखेर आज त्यांनी अधिकृतपणे प्रशासकीय जबाबदारी स्वीकारली.

भाजपच्या प्रमुख चेहऱ्यांना संधी 
भाजपच्या वतीने अनुभवी आणि तळागाळातील नेत्यांना संधी देण्यात आली आहे. यामध्ये लखीसरायचे आमदार विजय कुमार सिन्हा आणि सीमांचलचे नेते दिलीप जयस्वाल यांचा समावेश आहे. तसेच, 2025 मध्ये कृषी मंत्री राहिलेले राम कृपाल यादव यांनीही शपथ घेतली. उच्चवर्णीय आणि मागासवर्गीय समीकरणाचा समतोल राखत नितीश मिश्रा, मिथिलेश तिवारी, केदार गुप्ता, लखेंद्र पासवान, संजय टायगर आणि श्रेयसी सिंह यांसारख्या नेत्यांना स्थान मिळाले आहे. विशेषतः आंतरराष्ट्रीय नेमबाज राहिलेल्या श्रेयसी सिंह यांच्या समावेशाची चर्चा रंगली आहे.

हेही वाचा – Suvendu Adhikari PA Death : याआधीही झाला होता सुवेंदू अधिकारींच्या पीएचा धक्कादायक मृत्यू; 2013 मधल्या ‘त्या’ घटनेच्या आठवणी ताज्या

जेडी(यू) च्या अनुभवी नेत्यांचा समावेश
नितीश कुमार यांच्या जेडी(यू) पक्षाकडून निष्ठावान नेत्यांना पसंती देण्यात आली आहे. यामध्ये नालंदाचे सलग 9 वेळा आमदार राहिलेले श्रवण कुमार आणि नितीश कुमार यांचे अत्यंत विश्वासू अशोक चौधरी यांचा समावेश आहे. तसेच, धमदाहाच्या 6 वेळा निवडून आलेल्या आमदार लेशी सिंह यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली. या विस्तारातून आगामी निवडणुकांचे सोशल इंजिनिअरिंग साधण्याचा प्रयत्न एनडीए सरकारने केल्याचे दिसून येते.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number