Sajiri Joshi : आईच्या पावलावर पाऊल! मराठी अभिनेत्रीच्या लेकीने मारली बाजी; पहिल्याच चित्रपटासाठी पटकावला ‘सर्वोत्कृष्ट पदार्पण’ पुरस्कार

नुकत्याच पार पडलेल्या दिमाखदार 'झी चित्र गौरव' पुरस्कार सोहळ्यात साजिरी जोशी हिला 'सर्वोत्कृष्ट प्रतिभाशाली पदार्पण अभिनेत्री' (Best Promising Debut Actress) या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Sajiri Joshi : आईच्या पावलावर पाऊल! मराठी अभिनेत्रीच्या लेकीने मारली बाजी; पहिल्याच चित्रपटासाठी पटकावला ‘सर्वोत्कृष्ट पदार्पण’ पुरस्कार

Rujuta Deshmukh Daughter Sajiri Joshi First Film Award : मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री ऋजुता देशमुख हिच्यासाठी सध्या आनंदाचा आणि अभिमानाचा काळ आहे. ऋजुताच्या पावलावर पाऊल ठेवत अभिनयात पदार्पण करणाऱ्या तिच्या लेकीने, साजिरी जोशी हिने आपल्या पहिल्याच चित्रपटासाठी मानाचा पुरस्कार पटकावला आहे. साजिरीच्या या यशामुळे मराठी चित्रपटसृष्टीत तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

‘झी चित्र गौरव’वर साजिरीचे नाव
नुकत्याच पार पडलेल्या दिमाखदार ‘झी चित्र गौरव’ पुरस्कार सोहळ्यात साजिरी जोशी हिला ‘सर्वोत्कृष्ट प्रतिभाशाली पदार्पण अभिनेत्री’ (Best Promising Debut Actress) या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. साजिरीने 2025 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘एप्रिल मे 99’ या चित्रपटातून सिनेसृष्टीत पाऊल ठेवले होते. आपल्या पहिल्याच भूमिकेत तिने प्रेक्षकांची आणि परीक्षकांची मने जिंकली, ज्याची पावती आता या पुरस्काराच्या रूपाने तिला मिळाली आहे.

ऋजुता देशमुखची भावूक पोस्ट
लेकीला पुरस्कार मिळाल्यानंतर ऋजुता देशमुखने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत आपला आनंद व्यक्त केला. ऋजुता म्हणाली, “हा आमच्यासाठी अभिमानाचा आणि कौतुकाचा क्षण आहे. पहिला चित्रपट, पहिले बक्षीस आणि प्रेक्षकांचे इतके प्रेम! आमच्या लेकीला, साजिरी जोशीला झी चित्र गौरवचा पुरस्कार मिळाला आहे. या यशात चित्रपट दिग्दर्शक रोहन म्हापुसकर आणि ‘एप्रिल मे ९९’ च्या संपूर्ण टीमचा मोठा वाटा आहे.” ऋजुताच्या या पोस्टवर चाहत्यांनी आणि सेलिब्रिटींनी साजिरीवर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.

हेही वाचा – Priyanka Chopra : ‘मी फक्त 11 वर्षांची होते आणि कॅबमध्ये…, तेव्हा माझ्या आईची दुसरी बाजू पाहिली’; ‘दि ब्लफ’च्या प्रमोशनवेळी प्रियांका चोप्रानं सांगितला थरारक अनुभव

कोकणातील उन्हाळ्याची ती आठवण
‘एप्रिल मे 99’ हा चित्रपट 23 मे 2025 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाची कथा कोकणातील निसर्गरम्य वातावरणात घडणाऱ्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांवर आधारित आहे. लहान मुलांच्या भावविश्वावर भाष्य करणाऱ्या या चित्रपटाचे दिग्दर्शन रोहन मापुसकर यांनी केले होते. या चित्रपटात साजिरी जोशीसह आर्यन मेंघजी, श्रेयस थोरात आणि मंथन काणेकर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका होत्या. या चित्रपटातील साजिरीच्या नैसर्गिक अभिनयाचे चित्रपट प्रदर्शनावेळीही विशेष कौतुक झाले होते.

वारसा अभिनयाचा
ऋजुता देशमुखने अनेक गाजलेल्या मालिका, नाटके आणि चित्रपटांतून आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. आता तिची लेक साजिरीदेखील त्याच वाटेवर यशस्वीपणे चालताना दिसत आहे. एका सशक्त अभिनेत्रीची मुलगी असूनही साजिरीने स्वतःच्या मेहनतीवर ही ओळख निर्माण केली आहे. फेब्रुवारी 2026 मधील या पुरस्काराच्या घोषणेनंतर साजिरी आता आगामी काळात कोणत्या प्रकल्पात दिसणार, याकडे चित्रपटसृष्टीचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा – Nick Jonas: ‘देसी गर्ल’च्या विदेशी पतीचा इंडियन स्वॅग; निक जोनसने असं काय केलं की, भारतीय चाहतेही पडले त्याच्या प्रेमात

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number