Jay Pawar birthday : जय पवारांच्या वाढदिवसानिमित्त पत्नी ऋतुजा यांची भावूक पोस्ट, अजित पवार यांची आठवण काढत जुने फोटो केले शेअर

विमान अपघातात अजित पवार यांच्या झालेल्या दुर्दैवी निधनामुळे संपूर्ण पवार कुटुंब सध्या कठीण प्रसंगातून जात आहे. या कठीण काळात जय पवार यांच्या पत्नी ऋतुजा पवार यांनी एक हृदयस्पर्शी पोस्ट शेअर केली आहे.

Jay Pawar birthday : जय पवारांच्या वाढदिवसानिमित्त पत्नी ऋतुजा यांची भावूक पोस्ट, अजित पवार यांची आठवण काढत जुने फोटो केले शेअर

Rutuja Pawar post on Jay Pawar birthday : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने महाराष्ट्र अद्याप धक्क्यात असतानाच, त्यांचे सुपुत्र जय पवार यांचा वाढदिवस यंदा अत्यंत साध्या आणि भावूक वातावरणात पार पडला. जय पवार यांचा वाढदिवस 29 फेब्रुवारी रोजी असतो, जी तारीख 4 वर्षातून एकदा येते. मात्र, यंदा पितृछत्र हरपल्यामुळे पवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. या कठीण काळात जय पवार यांच्या पत्नी ऋतुजा पवार यांनी सोशल मीडियावर एक हृदयस्पर्शी पोस्ट शेअर केली आहे.

अजित पवारांच्या आठवणीत ऋतुजा यांची पोस्ट
विमान अपघातात अजित पवार यांच्या झालेल्या दुर्दैवी निधनामुळे संपूर्ण पवार कुटुंब सध्या कठीण प्रसंगातून जात आहे. जय पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ऋतुजा पवार यांनी अजित पवार आणि जय पवार यांचा एक खास फोटो शेअर केला आहे. “हे सगळं अजूनही अविश्वसनीय वाटत आहे. मात्र, या संकटकाळात तुम्ही (जय पवार) जे धाडस आणि ताकद दाखवली, त्याचा मला सार्थ अभिमान आहे,” अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

हेही वाचा – Sudhakar Shrotri Passes Away: पुष्कर श्रोत्रीचे पितृछत्र हरपले; 89व्या वर्षी वडिलांनी घेतला अखेरचा श्वास

4 वर्षातून एकदा येणारा वाढदिवस आणि आजची स्थिती
जय पवार यांचा जन्म ‘लीप इयर’ मध्ये म्हणजेच 29 फेब्रुवारीला झाला आहे. दर 4 वर्षांनी येणारा हा दिवस त्यांच्यासाठी खास असतो, पण यंदा वडिलांच्या निधनामुळे कोणताही जल्लोष करण्यात आला नाही. सध्याची राजकीय आणि कौटुंबिक स्थिती पाहता जय पवार यांनी संयम राखत कुटुंबाला सावरले आहे. ऋतुजा पवार यांच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स करत अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली असून जय पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा – Dr. Janardhan Waghmare Passes Away : ज्येष्ठ साहित्यिक आणि माजी खासदार डॉ. जनार्दन वाघमारे यांचे निधन; 91 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

वडिलांचा वारसा आणि जय पवार यांचा स्वभाव
ऋतुजा यांनी आपल्या पोस्टमध्ये अजित पवारांच्या संस्कारांचा विशेष उल्लेख केला आहे. त्या म्हणतात, “दादांनी राज्याच्या कल्याणासाठी आणि लोकांच्या मदतीसाठी स्वतःला वाहून घेतले होते. त्यांच्या व्यस्त वेळापत्रकातही त्यांनी एक प्रामाणिक, शूर आणि निस्वार्थी माणूस (जय पवार) निर्माण केला. हे अनुभवण्याचे भाग्य मला लाभले, यासाठी मी स्वतःला नशीबवान समजते.” जय पवार ज्या पद्धतीने स्वतःच्या गरजांपेक्षा इतरांच्या गरजांना प्राधान्य देतात, याचे कौतुकही ऋतुजा यांनी केले आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number