Sunil Tatkare on Rohit Pawar: मंगळवारी रात्री उशीरा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि शरद पवारांची भेट झाली, तटकरेंनी सिल्वर ओकवर जाऊन पवरांची भेट घेतली होती. त्यामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. पुन्हा राष्ट्रवादी एकत्र येणार असं लोकांना वाटू लागलं होत. शरद पवार आणि सुनिल तटकरे यांच्या भ्टीनंतर शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी सुनिल तटकरे आणि प्रफुल पटेलांविरोधात धक्कादायक खुलासा केला आहे. सुनेत्रा पवारांना शह देण्यासाठी आणि राष्ट्रवादीत मोठी फूट पाडण्याच्या तटकरे आणि पटेल मोठा डाव टाकणार आहेत. राष्ट्र्रवादीच्या त्या 22 आमदारांना घेऊन तटकरे आणि प्रफुल पटेल भाजपमध्ये जाऊन निवडणूक लढणार आहेत. असा मोठा दावा शरद पवार गटाच्या रोहित पवारांनी केला आहे. त्यात मोठी बाब म्हणजे एकनाथ शिंदेंच्या सुद्धा काही आमदारांचा समावेश आहे आणि ते सुद्धा भाजपच्या गळाला लागले आहेत असा दावा रोहित पवारांचा आहे.
रोहित पवारांनी केलेल्या या वक्तव्यावर सुनिल तटकरेंची प्रतिक्रिया समोर आली आहे. यावेळी सुनिल तटकरे म्हणाले की, “रोहित पवार यांच मानसिक संतुलन बिघडलय… रोहित पवार अनेक वेळा भाजपमध्ये जाण्यासाठी तयार होते त्यांनी आमच्या निष्ठेच्या पूरोगामिवीचाराच्या गप्पा मारण्याची काही गरज नाही, तो त्यांचा नैतिक अधिकार नाही… NDA, महायुती बळकट करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत… बुद्धीभेद करण्याचा धंदा काही लोक करीत आहेत त्यांना तो लखलाभ… पार्थ पवार आणि पटेल यांच्यात फाटलय हे अत्यंत चुकीच आहे, निराधार आहे, काहीही अर्थ नाही…”
रोहित पवारांच विधान
सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल राष्ट्र्वादीत मोठी फूट पाडणार आहेत. राष्ट्रवादीच्या 22 आमदारांना घेऊन ते भाजपमध्ये प्रवेश करणार आणि भाजपमधून सर्व निवडणूक लढणार. ईडी आणि सीबीआईच्या भीतीने सर्व भाजपमध्ये प्रवेश करणार. भाजपसोबत त्यांची जवळीक वाढत आहेत म्हणून ते सर्व असा निर्णय घेणार . एकनाथ शिंदेंचे सुद्धा काही आमदार भाजपच्या गळाला लागलेले आहेत आणि ते सुद्धा पुढची निवडणूक भाजपमधून लढणार. जो पर्यंत दादांची राष्ट्रवादी भाजपसबत आहेत तो पर्यंत आम्ही एकत्र येणार नाही आणि चर्चा सुद्धा होणार नाही.