‘Wait and Watch…’ रोहिणी खडसेंचा जळजळीत इशारा; रुपाली चाकणकरांचा राजीनामा आणि अशोक खरात प्रकरणाने महाराष्ट्राचे राजकारण तापले

चाकणकर यांच्या राजीनाम्याची बातमी येताच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) च्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी सोशल मीडियावर कडक भाषेत पोस्ट केली आहे.

‘Wait and Watch…’ रोहिणी खडसेंचा जळजळीत इशारा; रुपाली चाकणकरांचा राजीनामा आणि अशोक खरात प्रकरणाने महाराष्ट्राचे राजकारण तापले

Rohini Khadse on Rupali Chakankar : नाशिकमधील स्वयंघोषित भोंदूबाबा अशोक खरात याच्याशी असलेल्या जवळच्या संबंधांमुळे आणि सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या वादग्रस्त फोटोंमुळे अडचणीत आलेल्या रुपाली चाकणकर यांनी अखेर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानंतर आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) अध्यक्ष सुनेत्रा पवार यांची भेट घेतल्यानंतर चाकणकर यांनी हे पाऊल उचलले. 20 मार्च 2026 रोजी झालेल्या या घडामोडीमुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

अशोक खरात प्रकरण आणि चाकणकरांवरील आरोप
नाशिकच्या अशोक खरातवर सुमारे 100 हून अधिक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आणि आक्षेपार्ह व्हिडिओ बनवल्याचा गंभीर आरोप आहे. या प्रकरणात रुपाली चाकणकर यांचे खरातसोबतचे काही जुने व्हिडिओ आणि फोटो व्हायरल झाले होते, ज्यामध्ये त्या खरातची पाद्यपूजा करताना आणि त्याला ‘विठ्ठला’ची उपमा देताना दिसत आहेत. विशेष म्हणजे, चाकणकर या खरातने स्थापन केलेल्या एका ट्रस्टच्या संचालिका होत्या. गेल्या वर्षी एका पीडित महिलेला मदत करण्याऐवजी त्यांनी खरातचीच पाठराखण केल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. या वाढत्या दबावामुळे अखेर त्यांना आपल्या पदावरून पायउतार व्हावे लागले.

रोहिणी खडसेंचा कडाडून हल्ला: “अहंकार धुळीस मिळेल!”
चाकणकर यांच्या राजीनाम्याची बातमी येताच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) च्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी सोशल मीडियावर आक्रमक पोस्ट केली आहे. “म्हणून जास्त उडायचं नसतं! आता सगळा अहंकार धुळीस मिळेल. आणखी काही गोष्टी बाहेर पडतील, ‘Wait and Watch’…” असा इशारा त्यांनी दिला. खडसे पुढे म्हणाल्या की, ज्या शिडीने तुम्ही वर गेलात, त्याच शिडीने खाली येण्याची वेळ आली आहे; हे सर्व तुमच्या कर्माचे फळ आहे. केवळ राजीनामा घेऊन हे प्रकरण थांबवू नये, तर यामागील सूत्रधारांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणीही त्यांनी मुख्यमंत्री आणि सुनेत्रा पवार यांच्याकडे केली आहे.

हेही वाचा – Sushma Andhare on Rupali Chakankar : ‘रुपाली चाकणकरांनी स्वत:ची अनामिका कापली आणि…’, ‘ते’ भयंकर फोटो दाखवत सुषमा अंधारेंचा मोठा गौप्यस्फोट

पोलीस तपासात खळबळजनक खुलासे
अशोक खरात प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाच्या (SIT) हाती आतापर्यंत 100 पेक्षा जास्त व्हिडिओ आणि 2 लॅपटॉप लागले आहेत. खरात महिलांना गुंगीचे औषध देऊन किंवा संमोहित करून त्यांच्यावर अत्याचार करत असल्याचे तपासात समोर आले आहे. या गंभीर गुन्ह्यात चाकणकर यांचा राजकीय वरदहस्त होता का, याचीही चौकशी करण्याची मागणी विरोधकांनी लावून धरली आहे. चाकणकर यांनी मात्र हे सर्व आरोप फेटाळले असून, “पारदर्शक तपासासाठी मी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा देत आहे,” असे स्पष्ट केले आहे.

राजकीय भविष्यावर प्रश्नचिन्ह
रुपाली चाकणकर यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदासोबतच राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचाही राजीनामा द्यावा, अशा सूचना पक्षांतर्गत देण्यात आल्याचे समजते. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाची प्रतिमा मळिन होऊ नये म्हणून हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. रोहिणी खडसे यांच्या दाव्यानुसार, हे केवळ हिमनगाचे टोक असून येणाऱ्या काळात या प्रकरणाशी संबंधित आणखी अनेक बड्या नेत्यांची नावे समोर येण्याची शक्यता आहे. या प्रकरणाने महायुती सरकारसमोर मोठे पेचप्रसंग निर्माण केले आहेत.

हेही वाचा – Ashok Kharat Case: भोंदू बाबा खरातचं ‘बिंग’ कसं फुटलं? पाच कोटींची खंडणी, सीसीटीव्ही फुटेज आणि तो ऑफिस बॉय, काय घडलं नेमकं?

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number