Thane Water Cut : ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! मुंब्रा, कळवा, दिवासह अनेक भागांत ‘या’ तारखेला 24 तास पाणीपुरवठा बंद

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (MIDC) जलशुद्धीकरण केंद्रात तातडीच्या देखभाल-दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आल्याने शहरातील मोठ्या भागाचा पाणीपुरवठा सलग 24 तास ठप्प राहणार आहे.

Thane Water Cut : ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! मुंब्रा, कळवा, दिवासह अनेक भागांत ‘या’ तारखेला 24 तास पाणीपुरवठा बंद

Thane Water Cut: उन्हाच्या तीव्र झळा सोसणाऱ्या ठाणेकरांच्या अडचणीत आता आणखी भर पडणार आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (MIDC) जलशुद्धीकरण केंद्रात तातडीच्या देखभाल-दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आल्याने शहरातील मोठ्या भागाचा पाणीपुरवठा सलग 24 तास ठप्प राहणार आहे. गुरुवार, 7 मे रोजी दुपारी 12 वाजेपासून ते शुक्रवार, 8 मे रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत नळांना पाणी येणार नाही.

पाणीकपातीचे मुख्य कारण
जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रातील मुख्य जलाशयावर (HSR) बारवी गुरुत्ववाहिनी क्र. 1, 2 आणि 3 च्या उन्नतीकरणाचे काम केले जाणार आहे. या तांत्रिक कामामुळे पाणीपुरवठा बंद ठेवणे अनिवार्य असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

तुमचा भाग यात आहे का? (बाधित क्षेत्रे):
पूर्णपणे बंद: दिवा, कळवा आणि मुंब्रा (प्रभाग क्र. 26 आणि 31 चे काही भाग सोडून) या प्रभाग समित्यांच्या अंतर्गत येणारे सर्व भाग.
अंशतः बंद: वागळे इस्टेटमधील रुपादेवी पाडा, किसननगर क्र. 2, नेहरूनगर आणि मानपाडा प्रभाग समितीमधील कोलशेत खालचा गाव. पाणीपुरवठा पुन्हा सुरू झाल्यानंतरही पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबाने पाणी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी आगाऊ पाणी साठवून ठेवावे.

हेही वाचा – Shiv Sena UBT Protest: पदोन्नतीत मराठी माणसाला डावललं; खासदार अरविंद सावंत यांच्या उपस्थितीत उबाठाचं LIC कार्यालयाबाहेर आंदोलन

मीरा-भाईंदरमध्येही 'पाणीबाणी'; मे महिन्यात दोन मोठे शटडाऊन
एल-निनोच्या प्रभावामुळे यंदा पाणी टंचाईचे संकट गडद झाले असून, जलसंपदा विभागाने मीरा-भाईंदर शहरासाठी विशेष पाणीकपात लागू केली आहे. मे महिन्यात दोन वेळा 24 तासांचा पूर्ण शटडाऊन जाहीर करण्यात आला आहे:
7 मे (गुरुवार): दुपारी 12 ते 8 मे दुपारी 12 पर्यंत.
21 मे (गुरुवार): दुपारी 12 ते 22 मे दुपारी 12 पर्यंत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number