Sushma Andhare: ‘संजय राऊत आणि ठाकरे कुटुंबियांमधील तणावाच्या बातम्या म्हणजे…’; सुषमा अंधारेंचा भाजप आणि एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल

संजय राऊत आणि ठाकरे कुटुंबीयांमध्ये तणाव असल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगत आहेत. या पार्श्वभूमीवर सुषमा अंधारे यांनी आक्रमक पवित्रा घेत हे सर्व दावे फेटाळून लावले आहेत.

Sushma Andhare: ‘संजय राऊत आणि ठाकरे कुटुंबियांमधील तणावाच्या बातम्या म्हणजे…’; सुषमा अंधारेंचा भाजप आणि एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल

Sushma Andhare:  शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते संजय राऊत आणि ठाकरे कुटुंबीयांमध्ये तणाव असल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगत आहेत. या पार्श्वभूमीवर सुषमा अंधारे यांनी आक्रमक पवित्रा घेत हे सर्व दावे फेटाळून लावले आहेत. “भाजपची ‘फोडा आणि राज्य करा’ ही नीती असून, महाविकास आघाडीचा एकोपा तोडण्यासाठी दिल्लीतील काही पत्रकारांच्या माध्यमातून जाणीवपूर्वक अशा ‘टेबल न्यूज’ चालवल्या जात आहेत,” असा गंभीर आरोप अंधारे यांनी केला आहे.

कौटुंबिक हल्ले टाळा; राजकारणात मर्यादा पाळा
रामनवमीचे औचित्य साधत सुषमा अंधारे यांनी विरोधकांना राजधर्माची आठवण करून दिली. “युद्धशास्त्रात आणि राजकारणात काही नियम असतात. प्रतिस्पर्ध्याशी लढताना त्याच्या कुटुंबीयांवर हल्ले करायचे नसतात,” असे त्या म्हणाल्या. त्यांनी उदाहरण दिले की, “मी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अनेकदा टीका केली, पण त्यांच्या पत्नीबद्दल (लता वहिनी) कधीही अपशब्द वापरला नाही. मात्र, काही लोकांना मर्यादा कशाशी खातात हेच माहित नाही,” अशा शब्दांत त्यांनी विरोधकांचा समाचार घेतला.

शस्त्र परवाना आणि पाण्याचा वाद: फडणवीसांना सवाल
पुण्यातील पाणीपुरवठा आणि शस्त्र परवान्यावरून होणाऱ्या आरोपांवर अंधारे यांनी स्पष्टीकरण दिले. मिरगावच्या ग्रामस्थांच्या मागणीनुसार तात्कालीन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी प्रति व्यक्ती प्रति दिन 30 लिटर या न्यायाने पाणी देण्याचा निर्णय घेतला होता. “पाणी ही मानुसकीची गरज आहे, पण शस्त्र परवाना ही मानुसकी नाही,” असे त्या म्हणाल्या. त्यांनी थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आव्हान दिले की, 2012 मध्ये मिळालेल्या शस्त्र परवान्याचे 2024 मध्ये नूतनीकरण गृहखात्याने का केले? हिंमत असेल तर यावर बोला.

नीलम गोरेंवर टीका  
विधान परिषदेच्या सभापती नीलम गोरे यांच्यावरही अंधारे यांनी निशाणा साधला. “चौथ्या-पाचव्या फळीतील महिलांनी जिल्हा सर केला असून, गोरे यांनी पुण्यात संघटना संपवली आहे. त्यांनी पक्षावर आणि संघटना बांधणीवर बोलावे, वैयक्तिक टीकेत वेळ घालवू नये,” असा सल्ला त्यांनी दिला. तसेच, सोशल मीडियावरील ट्रोलिंगवर भाष्य करताना त्या म्हणाल्या की, काही लोकांचे ‘उपद्रव्य मूल्य’ आता शून्य झाले आहे, त्यामुळे त्यांना ट्रोल करण्याइतपतही कोणी गांभीर्याने घेत नाही.

हेही वाचा – VBA VS Imtiyaz Jaleel : संभाजीनगरमध्ये खळबळ! इम्तियाज जलील यांच्याविरुद्ध मानहानीचा दावा; वंचितकडून एक कोटींची नोटीस

ठाकरे आणि पवारांच्या निष्ठेची दिली खात्री
पक्षांतर्गत वादाच्या अफवांवर पडदा टाकताना अंधारे म्हणाल्या की, “मी देवेंद्र फडणवीस, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दल खात्री देऊ शकते की ते पाठीत वार करणारे नेते नाहीत. उद्धव साहेबांच्या हातातील रुद्राक्ष ही त्यांच्या वडिलांची पुण्याई आहे, ते अंधश्रद्धेच्या अशा कोणत्याही वादात पडणार नाहीत.” विरोधकांनी कितीही प्रयत्न केले तरी ठाकरे गटातील एकजूट कायम राहील, असा विश्वास सुषमा अंधारे यांनी व्यक्त केला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number