PMC Election : पुण्यात महायुतीत बिनसलं? भाजपसोबत गणित जुळेना.. धंगेकरांनी घेतली अजित पवारांची भेट

भाजपकडून केवळ 15 जागांचा प्रस्ताव मिळाल्याने नाराज झालेल्या शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेसचा (अजित पवार गट) हात धरण्याचे संकेत दिले आहेत.

PMC Election : पुण्यात महायुतीत बिनसलं? भाजपसोबत गणित जुळेना.. धंगेकरांनी घेतली अजित पवारांची भेट

PMC Election : पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीचा आखाडा आता चांगलाच तापला असून, सत्ताधारी महायुतीमध्ये ‘बिघाडी’ झाल्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत. एकेकाळी खांद्याला खांदा लावून लढणाऱ्या भाजप आणि शिवसेना शिंदे गटात जागावाटपावरून ठिणगी पडली आणि बघता बघता पुण्याचे राजकीय समीकरणच पालटले. सन्मानजनक जागा मिळत नसल्याचा राग मनात धरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोन फिरवला आणि राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. या एका फोन कॉलने पुणे भाजपच्या गोटात अस्वस्थता पसरली असून, नव्या आघाडीच्या हालचालींनी वेग घेतला आहे.

अजितदादांच्या ‘जिजाई’ बंगल्यावर खलबतं
भाजपकडून केवळ 15 जागांचा प्रस्ताव मिळाल्याने नाराज झालेल्या शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेसचा (अजित पवार गट) हात धरण्याचे संकेत दिले आहेत. सोमवारी सायंकाळी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यात फोनवरून प्रदीर्घ चर्चा झाली. या चर्चेनंतर लगेचच माजी आमदार रवींद्र धंगेकर आणि शिवसेनेचे इतर प्रमुख नेते पुण्यातील अजित पवारांच्या ‘जिजाई’ बंगल्यावर दाखल झाले. विशेष म्हणजे, या बैठकीला शरद पवार गटाचे काही नेतेही उपस्थित असल्याची माहिती समोर येत असल्याने पुण्यात एक वेगळीच ‘शिवसेना-राष्ट्रवादी’ युती उदयाला येण्याची दाट शक्यता आहे.

हेही वाचा – BMC Election 2026 : काँग्रेसची 87 उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध; दिग्गज नेत्यांच्या नातेवाईकांनाही संधी

जागावाटपाचा आकडा आणि पेच
मिळालेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने अजित पवारांच्या राष्ट्रवादीसमोर 25 ते 30 जागांचा प्रस्ताव ठेवला आहे. शिवसेनेला ज्या प्रभागांमध्ये रस आहे, त्या जागांची पडताळणी करून अजित पवार अंतिम निर्णय घेणार आहेत. याआधी शिवसेनेने भाजपलाही 25 ते 30 जागांची मागणी केली होती, परंतु भाजपने ती फेटाळून लावल्याने हा वाद विकोपाला गेला.

शिवसेनेचे दबावतंत्र की भाजपला शह?
भाजपने सन्मानजनक वागणूक न दिल्याने शिवसेनेचे पुणे शहरातील पदाधिकारी अत्यंत आक्रमक झाले आहेत. या तणावाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या बैठकीत नाना भानगिरे आणि विजय शिवतारे यांच्यात शाब्दिक चकमकही उडाली. अशा परिस्थितीत अजित पवारांशी संधान बांधून शिवसेनेने एकाच दगडात दोन पक्षी मारण्याचा प्रयत्न केला आहे. या निर्णयामुळे भाजपवर दबाव वाढवणे आणि राष्ट्रवादीच्या सोबतीने शहरात आपली ताकद दाखवणे, अशी दुहेरी रणनीती एकनाथ शिंदे यांनी आखल्याचे बोलले जात आहे.

नव्या राजकीय समीकरणाची नांदी
पुणे महानगरपालिकेत आता महायुती म्हणून न लढता स्वतंत्रपणे किंवा राष्ट्रवादीसोबत युती करून लढण्याचा निर्णय शिवसेनेने घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. रवींद्र धंगेकर यांच्या पुढाकाराने सुरू असलेल्या या हालचालींमुळे पुण्यात आता भाजप विरुद्ध उर्वरित सर्व पक्ष असा सामना रंगणार की काय, अशी चिन्हे दिसत आहेत. अजित पवार आता शिवसेनेच्या प्रस्तावावर काय मोहोर उमटवतात, याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत.

हेही वाचा – Kishori Pednekar : ठाकरेंच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या, माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना AB फॉर्म नाही?; मातोश्रीवर जाऊन घेतली उद्धव ठाकरेंची भेट

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number