Dombivli Politics: भाजपला मोठा धक्का! रवींद्र चव्हाण यांच्या निकटवर्तीय नेत्याचा ठाकरे गटात प्रवेश

भाजपला डोंबिवलीत मोठा धक्का बसला असून पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याच जवळच्या व्यक्तीने ठाकरे गटात प्रवेश केल्याची माहिती समोर आली आहे.<br/>

Dombivli Politics: भाजपला मोठा धक्का! रवींद्र चव्हाण यांच्या निकटवर्तीय नेत्याचा ठाकरे गटात प्रवेश

Dombivli Politics: राज्यात सध्या सर्वत्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी सुरू आहे. विविध पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर हालचाली सुरू झाल्या आहेत. अनेक नेते आणि कार्यकर्त्यांचे पक्षांतर सुरू असून, यामध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महायुतीचे दोन्ही गट सक्रिय दिसत आहेत. आतापर्यंत उद्धव ठाकरे गटातील काही पदाधिकारी महायुतीकडे वळले होते. मात्र आता उलट चित्र दिसू लागले आहे. भाजपला डोंबिवलीत मोठा धक्का बसला असून पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याच जवळच्या व्यक्तीने ठाकरे गटात प्रवेश केल्याची माहिती समोर आली आहे.

भाजपच्या महत्त्वाच्या युवा नेत्याचा उद्धव ठाकरे गटात प्रवेश

डोंबिवलीतील भाजप युवा मोर्चाचे उपाध्यक्ष असलेले योगेंद्र भोईर यांनी पक्षाचा निरोप घेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मध्ये प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे, योगेंद्र भोईर हे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे विश्वासू मानले जात होते. योगेंद्र आणि त्यांच्या पत्नी ट्विंकल भोईर यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांच्यासमोर पक्षप्रवेशाची औपचारिकता पूर्ण केली.  

हेही वाचा – Ajit Pawar Jalna Election : बंडखोरांसह मतदारांनाही तंबी, अजितदादा पोलिसांवरही संतापले

दरम्यान, भाजपची साथ सोडल्यानंतर योगेंद्र भोईर यांनी सोशल मीडियावर एक भावनिक संदेश शेअर केला. त्यांनी लिहिले, “बदल हा निसर्गाचा नियम आहे आणि प्रगतीसाठी स्वतःमध्ये बदल करणे आवश्यक असते. राजकीय आयुष्यातील कठीण निर्णय घेत आज मी भाजप परिवारातून बाहेर पडलो आहे. रवींद्र चव्हाण दादांच्या मार्गदर्शनाखाली खूप काही शिकता आले. त्यांचं योगदान मी कधी विसरणार नाही.” पुढे त्यांनी सांगितले, ‘परंतु नवीन ठिकाणी पोहोचायचे असेल तर जुन्या ठिकाणावरून मार्गक्रमण सुरू करावेच लागते. त्यामुळे वैयक्तिक पातळीवर निर्णय घेऊन मी आता उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली माझी पुढील राजकीय वाटचाल सुरू करणार आहे.’

हेही वाचा – Sanjay Raut Tweet: मुंबई निवडणुकीत नवा ट्विस्ट! राऊतांच्या विधानाने माविआचे समीकरण बिघडले?

डोंबिवलीतील राजकारणात बदलाची चिन्हे

योगेंद्र भोईर यांचा ठाकरे गटात प्रवेश हा फक्त एका नेत्याचा पक्षबदल नसून, डोंबिवलीच्या राजकारणात नव्या समीकरणांची सुरुवात मानली जात आहे. भाजपच्या स्थानिक संघटनांवरही याचा प्रभाव पडू शकतो, असा अंदाज राजकीय वर्तुळात व्यक्त केला जात आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा पक्षांतरांचा लोंढा अजून वाढणार की नवी उलथापालथ होणार, हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number