Sanjay Raut On Thackeray Alliance: राज आणि उद्धव ठाकरे यांची युती; राऊत म्हणाले, ‘राम-लक्ष्मण एकत्र आलेत’

या युतीवर भाष्य करताना शिवसेना (उबाठा) खासदार संजय राऊत यांनी, 'आज महाराष्ट्रात राम-लक्ष्मण एकत्र आले आहेत,' अशा शब्दांत आपला आनंद व्यक्त केला.<br/>

Sanjay Raut On Thackeray Alliance: राज आणि उद्धव ठाकरे यांची युती; राऊत म्हणाले, ‘राम-लक्ष्मण एकत्र आलेत’

Sanjay Raut On Thackeray Alliance: महाराष्ट्राच्या राजकारणात बुधवारी एका नव्या आणि ऐतिहासिक पर्वाचा सूर्योदय झाला. प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन भावांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. या युतीवर भाष्य करताना शिवसेना (उबाठा) खासदार संजय राऊत यांनी, ‘आज महाराष्ट्रात राम-लक्ष्मण एकत्र आले आहेत,’ अशा शब्दांत आपला आनंद व्यक्त केला.

मराठी ऐक्याचा ‘मंगल कलश’; राऊतांचा विरोधकांवर प्रहार

माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत भावूक झाले होते. ते म्हणाले, ‘जसा संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश राज्यात आला होता, तसाच मराठी ऐक्याचा हा मंगल कलश आज ठाकरे बंधूंनी जनतेला अर्पण केला आहे. हा दिवस प्रत्येक मराठी माणसासाठी अभिमानाचा आहे.’ यावेळी त्यांनी भाजप आणि शिंदे गटावर निशाणा साधताना म्हटले की, ‘बटेंगे तो कटेंगे’ ही भाषा करणाऱ्यांनी उत्तर भारतीयांमध्ये भीती निर्माण केली आहे, आम्ही मात्र सर्वांना सोबत घेऊन चालणारे आहोत.

हेही वाचा – Shital Mhatre : ठाकरे बंधूंच्या युतीआधीच राजकीय धुरळा; शीतल म्हात्रेंनी ठाकरे बंधूंना बोचरे प्रश्न विचारले

शिवतीर्थावर सहकुटुंब दर्शन आणि ऐतिहासिक घोषणा

या युतीची अधिकृत घोषणा करण्यापूर्वी संपूर्ण ठाकरे कुटुंब एकत्र पाहायला मिळाले. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी शिवतीर्थावर जाऊन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेतले. यावेळी रश्मी ठाकरे, शर्मिला ठाकरे, आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्या उपस्थितीने ‘एकवटलेल्या ठाकरे कुटुंबाचे’ चित्र स्पष्ट झाले. त्यानंतर वरळीतील ‘ब्लू सी’ हॉटेलमध्ये झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत या युतीवर शिक्कामोर्तब करण्यात आले.

सात महापालिकांत ‘मशाल’ आणि ‘इंजिन’ची युती

केवळ युतीच नाही, तर जागावाटपाचे सूत्रही ठरल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले. राज्यातील 7 महत्त्वाच्या महानगरपालिकांमध्ये ठाकरे गट आणि मनसे एकत्र निवडणूक लढवणार आहेत. यात मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे, नाशिक, कल्याण-डोंबिवली आणि मिरा-भाईंदरचा समावेश आहे. 

हेही वाचा – Raj-Uddhav Thackeray Yuti:ठाकरेंकडून युतीची अधिकृत घोषणा; मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत उद्धव-राज एकत्र

दिल्लीच्या बुटचाट्यांनी आम्हाला शिकवू नये 

ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर टीका करणाऱ्यांना राऊतांनी आपल्या शैलीत फटकारले. ‘दिल्लीच्या चरणी लाचारी करणाऱ्यांच्या पोटात या युतीमुळे भीतीचा गोळा आला आहे. ते केवळ बुट पॉलिश करणाऱ्यांचा मेळावा घेऊ शकतात. त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करण्याची गरज नाही. तळागाळातील मराठी माणूस आता ठामपणे ठाकरेंसोबत उभा आहे, अशा तिखट शब्दांत त्यांनी विरोधकांचा समाचार घेतला.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number