Konkan News : कोकणची अर्थव्यवस्था धोक्यात! शेती, पर्यटन आणि वाहतूक व्यवसाय अडचणीत, नेमकं कारण काय?

निसर्गाचा कोप आणि जागतिक घडामोडींमुळे रत्नागिरी जिल्ह्याचा मुख्य आर्थिक पाया असलेल्या शेती, पर्यटन आणि वाहतूक या तिन्ही क्षेत्रांना मोठा फटका बसला आहे. जागतिक युद्धामुळे निर्माण झालेली...

Konkan News : कोकणची अर्थव्यवस्था धोक्यात! शेती, पर्यटन आणि वाहतूक व्यवसाय अडचणीत, नेमकं कारण काय?

Ratnagiri economic crisis and Tourism Loss : महाराष्ट्राचे पर्यटन केंद्र आणि हापूस आंब्यासाठी जगप्रसिद्ध असलेला रत्नागिरी जिल्हा सध्या भीषण आर्थिक संकटाचा सामना करत आहे. निसर्गाचा कोप आणि जागतिक घडामोडींमुळे जिल्ह्याचा मुख्य आर्थिक पाया असलेल्या शेती, पर्यटन आणि वाहतूक या तिन्ही क्षेत्रांना मोठा फटका बसला आहे. जागतिक युद्धामुळे निर्माण झालेली गॅस टंचाई आणि 37 ते 41 अंशांपर्यंत पोहोचलेले तापमान यामुळे कोकणची अर्थव्यवस्था सध्या अत्यंत नाजूक स्थितीत पोहोचली आहे. बागायतदार आणि स्थानिक व्यावसायिक या दुहेरी संकटामुळे पूर्णपणे हवालदिल झाले आहेत.

पर्यटन-हॉटेल व्यवसायावर परिणाम
कोकणच्या अर्थव्यवस्थेत पर्यटनाचा वाटा सर्वाधिक आहे, मात्र सध्या या क्षेत्रात मोठी घसरण दिसत आहे. आखाती युद्धामुळे उद्भवलेल्या गॅस टंचाईमुळे जवळपास 50 टक्के हॉटेल व्यवसायावर परिणाम झाला असून, अनेक पदार्थांची उपलब्धता कमी झाली आहे. त्यातच तापमानाचा पारा 41 अंशांच्या वर गेल्यामुळे पर्यटकांनी समुद्रकिनाऱ्यांकडे पाठ फिरवली आहे, परिणामी ऐन हंगामात कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प झाल्याचे चित्र आहे.

वाहतूकदारांचा हप्ता जाणार कोठून
पर्यटकांची संख्या घटल्याचा सर्वाधिक फटका स्थानिक रिक्षा आणि टॅक्सी चालकांना बसत आहे. तासनतास प्रतीक्षा करूनही ग्राहक मिळत नसल्याने वाहतूकदारांची चाके अक्षरशः रुतल्याचे चित्र आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा आणि गाड्यांचे हप्ते कसे फेडायचे, या विवंचनेत स्थानिक चालक अडकले आहेत. पर्यटनावर अवलंबून असलेल्या या पूरक व्यवसायाची स्थिती बिकट झाली आहे.

हेही वाचा – Dignity of Public Representatives: राज्य सरकारचा मोठा निर्णय! आमदार-खासदारांचा 'VIP' थाट आता मोजून-मापूनच; काय आहेत नवे नियम? कोणाला होणार लागू?

आंबा-काजू उत्पादक संकटात
कोकणच्या ओळखीचा अविभाज्य भाग असलेला हापूस आंबा आणि काजू पिकाचे यंदा निसर्गाच्या लहरीपणामुळे मोठे नुकसान झाले आहे. कडक उन्हाळ्यामुळे बागांमधील मोहर करपून गेला असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत केवळ 20 टक्के पीक हाती लागल्याचे चित्र आहे. अवकाळी पाऊस आणि कडक उन्हाच्या दुहेरी फटक्याने बागायतदारांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेला असून शेती क्षेत्रावर मोठे संकट ओढवले आहे.

मदतीसाठी सरकारकडे अपेक्षा
निसर्गाची वक्रदृष्टी आणि आंतरराष्ट्रीय कारणांमुळे मोडून पडलेल्या या अर्थव्यवस्थेला आता सावरण्यासाठी सरकारी मदतीची गरज आहे. 'व्हेंटिलेटर'वर असलेल्या रत्नागिरीच्या पर्यटन आणि कृषी क्षेत्राला शासन मदतीचा 'ऑक्सिजन' पुरवून पुन्हा उभे करणार का, हा प्रश्न स्थानिक विचारत आहेत. संकटात सापडलेल्या बागायतदारांना आणि व्यावसायिकांना दिलासा देण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे.

हेही वाचा – Weather Update : वादळ येणार, उष्णताही वाढणार, विदर्भ आणि कोकणात…; राज्यात 'ते' संकट पुन्हा परतणार

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number