Ramdas Kadam On Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंची नार्को टेस्ट करा…; बाळासाहेबांच्या मृतदेहाबाबत दावा केल्यानंतर रामदास कदम यांची मागणी

‘मी खोटं बोलतोय हे सिद्ध करण्याची हिंमत उद्धव ठाकरेंनी दाखवावी. अन्यथा माझ्या आणि त्यांच्या दोघांचीही नार्को टेस्ट घ्यावी, अशी मागणीही कदम यांनी केली आहे.

Ramdas Kadam On Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंची नार्को टेस्ट करा…; बाळासाहेबांच्या मृतदेहाबाबत दावा केल्यानंतर रामदास कदम यांची मागणी

Ramdas Kadam On Uddhav Thackeray: शिवसेना (शिंदे गट) चे वरिष्ठ नेते रामदास कदम यांनी दसरा मेळाव्यात केलेल्या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. त्यांनी दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूनंतर त्यांचे हातांचे ठसे घेण्यात आल्याचा दावा केला. त्यांच्या या विधानावरून शिवसेना (ठाकरे गट) आणि शिंदे गट यांच्यात नव्याने संघर्ष पेटला आहे. यानंतर पत्रकार परिषद घेत रामदास कदम यांनी आपले विधान कायम ठेवत उद्धव ठाकरे यांना थेट आव्हान दिले. ‘मी खोटं बोलतोय हे सिद्ध करण्याची हिंमत उद्धव ठाकरेंनी दाखवावी. अन्यथा माझ्या आणि त्यांच्या दोघांचीही नार्को टेस्ट घ्यावी, अशी मागणीही कदम यांनी केली आहे. 

हेही वाचा – Bhaskar Jadhav on Ramdas Kadam: रामदास कदमांविरोधात भास्कर जाधवांची बोचरी टीका; कदमांना म्हणाले, 'बामदास कदम…'

रामदास कदम यांनी पत्रकार परिषदेत आरोपांची मालिका केली. ते म्हणाले, उद्धव ठाकरे कपटी आहेत. ते दिसतात तसे नाहीत. बाळासाहेब ठाकरे यांच्या मृतदेहावर दोन दिवस छळ झाला. मी त्यांना पायाचे ठसे घेण्याची सूचना केली असता, त्यांनी स्वतःच सांगितले की मी हातांचे ठसे घेतले आहेत. हे संभाषण माझे आणि उद्धव ठाकरेंचे झाले होते. आता प्रश्न असा आहे की हे ठसे नेमके कोणत्या कारणासाठी घेतले गेले? 

हेही वाचा – Sanjay Raut to Ramdas Kadam : मेळाव्यानंतर महाराष्ट्राचे राजकारण पेटले!; रामदास कदमांच्या आरोपावर संजय राऊतांचा पलटवार, म्हणाले…

राजकीय वर्तुळात खळबळ

या दाव्यानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. शिवसेना (ठाकरे गट) कडून या वक्तव्याचा तीव्र विरोध होत असून शिंदे गटाने कदम यांच्या पाठीशी उभे राहण्याचे संकेत दिले आहेत. दरम्यान, रामदास कदम यांनी म्हटलं आहे की, ‘मी खोटं बोलत नाही. महाराष्ट्राच्या जनतेला खरी माहिती मिळावी म्हणून हे बोलतो आहे. वाघाच्या कातड्याचा मुखवटा घालून बसलेल्यांनी लोकांना फसवले आहे. मी काल मंचावरून जे बोललो ते सत्य आहे.’ 
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number