Code of Conduct : राज्यसभेत घोषणाबाजीला ‘ब्रेक’! जय हिंद, वंदे मातरम्, थँक्स नकोच; सदस्यांसाठी आचारसंहिता जारी, विरोधीपक्षांचा तीव्र विरोध

हिवाळी अधिवेशनापूर्वीच संसद सदस्यांच्या वर्तनाबाबत एक नवीन आचारसंहिता (Code of Conduct) जारी केली आहे, ज्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे.

Code of Conduct : राज्यसभेत घोषणाबाजीला ‘ब्रेक’! जय हिंद, वंदे मातरम्, थँक्स नकोच; सदस्यांसाठी आचारसंहिता जारी, विरोधीपक्षांचा तीव्र विरोध

Code of Conduct : संसदेचे हिवाळी अधिवेशन 1 डिसेंबर पासून सुरू होण्यापूर्वीच, राज्यसभेने (Rajya Sabha) संसद सदस्यांच्या वर्तनाबाबत एक नवीन आचारसंहिता (Code of Conduct) जारी केली आहे, ज्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. या बुलेटिनमध्ये सदस्यांसाठी अनेक कठोर नियम आणि काही शब्दांच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. संसदेच्या परंपरेनुसार, भाषणाच्या शेवटी 'थँक्स'/'थँक यू' (Thanks/ Thank You), 'जय हिंद' आणि 'वंदे मातरम्' (Vande Mataram) सारख्या स्लोगन्सना परवानगी नाही, त्यामुळे सदस्यांनी भाषणाचा शेवट अशा घोषणांनी करू नये, असा सल्ला देण्यात आला आहे.

मंत्र्यावर टीका केल्यास सभागृहात उपस्थिती अनिवार्य
या बुलेटिनमधील दुसरा महत्त्वाचा निर्देश असा आहे की, जर एखाद्या सदस्याने कोणत्याही मंत्र्यावर टीका केली, तर मंत्र्यांनी त्या टीकेला उत्तर देत असताना संबंधित सदस्याने सभागृहात उपस्थित राहणे अनिवार्य केले आहे. उत्तरावेळी गैरहजर राहणे हे संसदीय शिष्टाचाराचे (Parliamentary Decorum) उल्लंघन मानले जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. सभागृहात कोणताही पुरावा सादर करण्यापासूनही सदस्यांनी दूर राहावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.

विरोधी पक्षांनी व्यक्त केली तीव्र नाराजी
राज्यसभेच्या या नवीन नियमांना काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेससह (TMC) विरोधी पक्षांनी जोरदार विरोध केला आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी जय हिंद आणि वंदे मातरम् बोलण्यास विरोध करण्याला बंगाली अस्मितेशी जोडून टीका केली आहे. दुसरीकडे, भाजपने (BJP) मात्र या वादावर संयत प्रतिक्रिया दिली आहे. पक्षाचे म्हणणे आहे की, राज्यसभेच्या निर्देशांमध्ये कोणतीही नवीन गोष्ट नाही आणि हे सर्व संसदीय परंपरेनुसार (Parliamentary Tradition) आहे.

हेही वाचा – Property Stamp Duty: महिलांच्या नावावर मालमत्ता खरेदीत घट; सवलत असूनही पुरुषांचा विश्वास कमी?

अध्यक्षांच्या निर्णयावर टीका करण्यास मनाई
भाजपच्या म्हणण्यानुसार, शपथग्रहणाच्या वेळी जय हिंद आणि वंदे मातरम् बोलण्याची परंपरा असली तरी, भाषणाच्या शेवटी अशा घोषणा करणे अनेकदा संसदेच्या कामकाजात व्यत्यय आणते, त्यामुळे बुलेटिनमधील हे निर्देश पूर्णपणे उचित आहेत. तसेच, या बुलेटिनमध्ये सदस्यांना सदनाच्या बाहेर अध्यक्षांच्या निर्णयांवर टीका करू नये, असा स्पष्ट निर्देश देण्यात आला आहे. सभागृहाच्या प्रतिष्ठेला धक्का बसेल असे वर्तन करण्यापासून संसद सदस्यांनी दूर राहावे, असेही यात नमूद करण्यात आले आहे.

उपराष्ट्रपतींच्या अध्यक्षतेखाली पहिले अधिवेशन
या हिवाळी अधिवेशनात उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन हे वरिष्ठ सभागृहात (राज्यसभेत) अध्यक्ष म्हणून कामकाज पाहणार आहेत. त्यांच्या अध्यक्षतेखालील हे पहिलेच अधिवेशन असणार आहे. त्यामुळे, नवीन आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांचा विरोध आणि कामकाजातील शिष्टाचार यांमुळे यंदाचे हिवाळी अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – WinZO Money Laundering Case : विन्झो गेमिंग प्लॅटफॉर्मचे संस्थापक सौम्या सिंह आणि पावन नंदा यांना ईडीकडून अटक; 505 कोटींची मालमत्ता गोठवली

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number