Raj Thackeray : ‘महाराष्ट्रात राहायचं तर मराठी बोलावंच लागेल!’ राज ठाकरेंचा परप्रांतीय रिक्षाचालकांना थेट इशारा; मनसैनिकांना दिले ‘हे’ आदेश

राज्य सरकारने रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असेल, तर इथल्या भाषेचा आदर राखणे ही प्राथमिक अट आहे, असे राज ठाकरे म्हणाले.

Raj Thackeray : ‘महाराष्ट्रात राहायचं तर मराठी बोलावंच लागेल!’ राज ठाकरेंचा परप्रांतीय रिक्षाचालकांना थेट इशारा; मनसैनिकांना दिले ‘हे’ आदेश

Raj Thackeray on Marathi Language : मुंबई आणि परिसरात परप्रांतीय रिक्षाचालकांकडून मराठी भाषेला होणाऱ्या विरोधावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. ‘बाहेरून आलेल्या रिक्षावाल्यांमध्ये ‘मराठी बोलणार नाही’ म्हणायची हिंमत येते कुठून?’ असा सवाल त्यांनी उपस्थित केला. आज 30 एप्रिल 2026 रोजी झालेल्या एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, महाराष्ट्राच्या मातीत व्यवसाय करायचा असेल, तर इथल्या भाषेचा आदर राखणे ही प्राथमिक अट आहे. गेल्या 20 वर्षांपासून आपल्याला एकाच गोष्टीसाठी संघर्ष करावा लागत आहे, ही दुर्दैवी बाब असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.

मराठी सक्ती आणि लायसन्स रद्द करण्याची मागणी
राज्य सरकारने रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी सरकारला बजावले की, केवळ नियम बनवून चालणार नाही, तर त्याची कडक अंमलबजावणी झाली पाहिजे. जे चालक मराठी शिकण्यास नकार देतील किंवा मराठी बोलण्यास टाळाटाळ करतील, त्यांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात यावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी याबाबत स्पष्ट घोषणा करत 1 मे 2026 पासून नियमाची कठोर अंमलबजावणी सुरू होणार असल्याचे सांगितले.

चिंतामणी देशमुखांचा ‘तो’ निर्णय
राज ठाकरेंनी भाषणात स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री चिंतामणी देशमुख यांच्याविषयी आणि त्यांच्या मातृभूमी आणि मातृभाषा मराठी यांच्या प्रेमाविषयी एक किस्सा सांगितला. मातृभाषेच्या सन्मानासाठी ज्या वेळी संयुक्त महाराष्ट्राचा लढा ऐन भरात होता आणि मुंबई महाराष्ट्राला मिळणार की नाही असा प्रश्न निर्माण झाला होता, तेव्हा चिंतामणी देशमुख हे केंद्र सरकारमध्ये अर्थमंत्री होते. मुंबई महाराष्ट्राला न देण्याच्या केंद्र सरकारच्या भूमिकेचा निषेध म्हणून त्यांनी थेट अर्थमंत्री पदाचा राजीनामा दिला होता. तसेच, तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना ‘तुमच्या मनात मराठी आणि महाराष्ट्राविषयी चांगली भावना नाही’, असेही सांगितले होते, असे राज ठाकरे यांनी सांगितले.

हेही वाचा – Pratap Sarnaik: रिक्षा, टॅक्सी, ओला-उबर काहीही असो, 1 मेपासून कारवाई होणारच; सरनाईकांनी परप्रांतियांना ठणकावून सांगितलं

मनसैनिकांना आक्रमकतेचे आदेश
राज ठाकरे यांनी केवळ भाषणापुरते मर्यादित न राहता आपल्या मनसे पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना स्पष्ट निर्देश दिले आहेत. जे रिक्षाचालक मराठीच्या विरोधात बळजबरीने संप घडवून आणतील किंवा दादागिरी करतील, त्यांना मनसे स्टाईलने ‘महाप्रसाद’ देण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. ‘जे रिक्षाचालक स्वेच्छेने काम करू इच्छितात आणि नियमांचे पालन करतात, त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा, पण जे महाराष्ट्राचा अपमान करतात त्यांना धडा शिकवा,’ असे आदेश त्यांनी कार्यकर्त्यांना दिले आहेत. या भूमिकेमुळे आगामी काळात रिक्षा संघटना आणि मनसे यांच्यातील संघर्ष तीव्र होण्याची शक्यता आहे.

राजकीय पडसाद आणि चर्चा
राज ठाकरे यांच्या या भूमिकेनंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. विरोधकांनी यावर टीका केली असली तरी, सामान्य मराठी माणसाकडून या भूमिकेचे स्वागत होताना दिसत आहे. मुंबईतील 10 लाखाहून अधिक रिक्षा-टॅक्सी चालकांपैकी मोठ्या प्रमाणावर चालक परप्रांतीय असल्याने हा प्रश्न केवळ भाषेचा नसून तो रोजगाराच्या अधिकाराचाही बनला आहे. आता शासन खरोखरच कठोर पावले उचलणार का आणि राज ठाकरेंची ही ‘मराठी सक्ती’ यशस्वी होणार का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा – Supriya Sule PC: सुप्रिया सुळेंचा ठाम निर्णय! ‘कुटुंबातील व्यक्तींविरोधात राजकारण नाही’; महाविकास आघाडीबाबतही मोठं वक्तव्य

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number