Raj Thackeray : राज ठाकरे पुन्हा ‘ॲक्शन मोड’मध्ये! महाराष्ट्र दौऱ्यांनंतर मुंबईत बैठकांचा सपाटा; Gen-Z च्या आंदोलनानंतर…

Gen-Z च्या यशस्वी आंदोलनानंतर राज ठाकरे यांनी राजकारणात पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे.

Raj Thackeray : राज ठाकरे पुन्हा ‘ॲक्शन मोड’मध्ये! महाराष्ट्र दौऱ्यांनंतर मुंबईत बैठकांचा सपाटा; Gen-Z च्या आंदोलनानंतर…

Raj Thackeray MNS politics : गेल्या 14 वर्षांपासून सातत्याने राजकीय संघर्षाचा सामना करणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला (मनसे) पुनरुज्जीवित करण्यासाठी अध्यक्ष राज ठाकरे पुन्हा एकदा पूर्ण ताकदीने मैदानात उतरले आहेत. 2009 च्या विधानसभा आणि 2012 च्या महापालिका निवडणुकीतील उल्लेखनीय यशानंतर पक्षाच्या आलेखात घसरण पाहायला मिळाली होती. 2014 आणि 2019 च्या विधानसभा निवडणुकीत मनसेचा अवघा एक आमदार निवडून आला होता, तर 2024 च्या निवडणुकीत पक्षाला खातेही उघडता आले नव्हते. मात्र, आता Gen-Z च्या यशस्वी आंदोलनानंतर राज ठाकरे यांनी राजकारणात पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे.

नाशिक अन् रायगड दौऱ्यात केंद्र सरकारवर जोरदार प्रहार
पक्षाला बळकटी देण्यासाठी राज ठाकरे यांनी नुकताच महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांचा धडाकेबाज दौरा केला. नाशिक दौऱ्यावर असताना त्यांनी 'नीट' (NEET) परीक्षेतील गोंधळावरून आणि देशातील खालावलेल्या शिक्षणव्यवस्थेवरून मोदी सरकारला चांगलेच धारेवर धरले. यानंतर रायगड दौऱ्यावर असताना गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या मुद्द्यावरून त्यांनी थेट केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याशी फोनवरून थेट चर्चा करत आपला संताप व्यक्त केला.

हेही वाचा – E20 Petrol Controversy : E20 पेट्रोल वादात भाजप खासदाराचं बेताल वक्तव्य; म्हणाले, 'शुद्ध पेट्रोल तुमच्या बापाच्या घरातून…'

मुंबईतील 14 मतदारसंघांसाठी पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर
महाराष्ट्राचा दौरा आटोपून मुंबईत परतताच राज ठाकरे यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची एक अत्यंत महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी मुंबईतील 14 विधानसभा मतदारसंघांसाठी नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करून प्रत्येकाची जबाबदारी निश्चित केली. मुंबईतील पक्ष संघटना तळागाळात मजबूत करण्यासाठी आणि पक्षविस्ताराला गती देण्यासाठी राज ठाकरे यांनी स्वतःच्या उपस्थितीत या नियुक्त्यांची घोषणा केली.

2029 च्या विधानसभा निवडणुकीचे ध्येय ठेवून कामाला लागण्याचे आदेश
बैठकीत उपस्थितांना मार्गदर्शन करताना राज ठाकरे यांनी आगामी राजकीय आव्हानांचा सामना करण्यासाठी रणशिंग फुंकले. 'आतापासूनच पक्ष संघटना वाढवण्यासाठी सक्रिय व्हा आणि 2029 च्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कामाला लागा,' अशा कडक सूचना त्यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना दिल्या. सातत्याने मिळणाऱ्या पराभवाच्या सावटातून बाहेर पडून मनसेला पुन्हा एकदा वैभवाच्या शिखरावर नेण्यासाठी राज ठाकरेंनी आखलेला हा नवा मास्टरप्लॅन ठरतो का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

हेही वाचा – PM Modi NCP MPs Meeting: नवी मुंबई विमानतळ नामकरण ते उजनीचं पाणी… पवारांच्या खासदारांनी पंतप्रधानांसमोर मांडल्या 'या' मागण्या

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number