Raj Thackeray : राज ठाकरे प्रथमच महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत; मुंबई महापालिका एकत्र लढणार असल्याची नांदी

राज ठाकरे यांची महाविकास आघाडीसोबतच्या नेत्यांशी ही जवळीक पाहून आता ठाकरे बंधू महापालिका निवडणूक एकत्र लढणार, अशा अटकळा बांधल्या जात आहेत.

Raj Thackeray : राज ठाकरे प्रथमच महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत; मुंबई महापालिका एकत्र लढणार असल्याची नांदी

Raj Thackeray On Maharashtra Election: राज्यातील प्रमुख विरोधी पक्षांनी आज मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांची भेट घेतली. विशेष म्हणजे यावेळी मनसे नेते राज ठाकरे देखील महाविकास आघाडीतील नेत्यांसोबत दिसले. राज ठाकरे यांची महाविकास आघाडीसोबतच्या नेत्यांशी ही जवळीक पाहून आता ठाकरे बंधू महापालिका निवडणूक एकत्र लढणार, अशा अटकळा बांधल्या जात आहेत. या बैठकीत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार, जितेंद्र आव्हाड, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, शिवसेना ठाकरे गटाचे अनिल देसाई, अनिल परब, शेकापचे जयंत पाटील आणि इतर नेते उपस्थित होते. या बैठकीत राज ठाकरे यांनी मतदार यादीतील गडबड, मतदान नोंदणी प्रक्रियेत विसंगती आणि निवडणुकीसाठी आयोगाची तयारी याबाबत प्रश्न उपस्थित केले. राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला खालील सवाल विचारले…

हेही वाचा – Anjali Damania : 'अजित पवारांनी कृषी मंत्री जरूर व्हावे…', अंजली दमानियांची सोशल मिडिया पोस्ट व्हायरल

– निवडणूक लागलेली नाही तरी मतदान नोंदणी बंद का केली ? 
– जे आज 18 वय पूर्ण करत आहे, त्यांनी मतदान करू नये का ? 
– अनेक जिल्ह्यात दोन दोन ठिकाणी मतदारांची नावे आहेत, त्याचं काय करायचं? 
– मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ आहे, या घोळाचं काय करायचं?
– वडिलांचे वय मुलाच्या वयापेक्षा कमी कसे? 
– निवडणूक याद्यांमध्ये एवढा घोळ, तुम्ही कसं निवडणुकांना सामोरे जाता ? 
– 31 जानेवारी पर्यंत निवडणूक घेण्याचे आपल्याला आदेश आहे. आपण आम्हाला उत्तर द्या की तुम्ही निवडणुकीसाठी सज्ज आहात का ?

हेही वाचा – Ambadas Danve : 'कटप्रमुखां'च्या योजना 'चालू सरकार'नं केल्या बंद; शिंदे-फडणवीसांना अंबादास दानवेंचा टोला

याबरोबरच, जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी 18 नोव्हेंबरला आयोगाला दिलेल्या पत्रातील मुद्द्यांवर लक्ष वेधले आणि खोट्या मतदार नोंदणीचा तपशील मागितला. बैठकीदरम्यान शिष्टमंडळाने निवडणूक आयोगाच्या कारभाराबाबत शंका व्यक्त केल्या. यात म्हटलं आहे की, आयोग खरोखर स्वायत्त आहे की नाही? लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत किती मतदार वगळले गेले, त्याचा तपशील का उपलब्ध नाही? मतदारांची नावे का काढली जातात आणि त्याचा पूर्ण तपशील संकेतस्थळावर का उपलब्ध नाही? मतदार यादीवर अभ्यास करणे प्रत्येक पक्षाचा हक्क आहे. परंतु, ते लपवण्यात काही राजकीय हेतू किंवा दबाव आहे का? अशा अनेक प्रश्नांची सरबत्ती विरोधी पक्षातील नेत्यांनी निवडणूक आयोगावर केली. या बैठकीत विरोधी पक्षांच्या नेत्यांनी मतदार यादीतील विसंगती आणि निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेसाठी आयोगाने त्वरित उपाययोजना करण्याची मागणी केली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number