Pakistan Floods: पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वामध्ये पावसाचा हाहाकार; 23 मुलांसह 45 जणांचा मृत्यू

गेल्या 10 दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे विविध दुर्घटनांमध्ये आतापर्यंत किमान 45 जणांनी आपला जीव गमवावा लागला आहे.

Pakistan Floods: पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वामध्ये पावसाचा हाहाकार; 23 मुलांसह 45 जणांचा मृत्यू

Pakistan Floods: वायव्य पाकिस्तानमधील खैबर पख्तूनख्वा प्रांतात निसर्गाचा कोप पाहायला मिळत असून मुसळधार पावसाने भीषण परिस्थिती निर्माण केली आहे. गेल्या 10 दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे विविध दुर्घटनांमध्ये आतापर्यंत किमान 45 जणांनी आपला जीव गमवावा लागला आहे, तर 105 जण गंभीर जखमी झाले आहेत. प्रांतीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (PDMA) रविवारी ही आकडेवारी जाहीर केली असून, मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

मृतांमध्ये 23 चिमुकल्यांचा समावेश; घरांची मोठी पडझड
PDMA च्या अहवालानुसार, 25 मार्चपासून सुरू झालेल्या या पावसामुळे झालेल्या जीवितहानीत मुलांचे प्रमाण सर्वाधिक आहे. मृत्यूमुखी पडलेल्या 45 जणांमध्ये 23 मुले, 17 पुरुष आणि 5 महिलांचा समावेश आहे. जखमींमध्येही 44 मुलांचा समावेश असून त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. मुसळधार पावसामुळे कच्च्या घरांची छपरे आणि भिंती कोसळल्याने अनेक कुटुंबे उघड्यावर आली आहेत. विशेषतः ग्रामीण भागातील दोन डझनांहून अधिक जिल्ह्यांमध्ये पावसाने हाहाकार माजवला आहे.

वित्तहानीचा आकडा वाढला 
पावसाच्या या प्रकोपाचा मोठा फटका मालमत्तेलाही बसला आहे. प्राथमिक अंदाजानुसार एकूण 442 घरांचे नुकसान झाले असून, त्यापैकी 382 घरांचे अंशतः नुकसान झाले आहे, तर 60 घरे पूर्णपणे जमीनदोस्त झाली आहेत. आपत्तीग्रस्त भागात सध्या बचाव आणि मदत कार्य युद्धपातळीवर सुरू आहे. यामध्ये PDMA, 'रेस्क्यू 1122', जिल्हा प्रशासन आणि इतर स्थानिक संस्था समन्वयाने काम करत असून बाधितांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

हेही वाचा – Donald Trump Warns Iran: 'तेलावर ताबा मिळवणार अन् सर्व काही उद्ध्वस्त करू…'; डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीने इराणमध्ये खळबळ

9 एप्रिलपर्यंत पुन्हा पावसाचा इशारा; पर्यटकांना सतर्कतेच्या सूचना
खैबर पख्तूनख्वा प्रांतातील संकट अद्याप टळलेले नाही. PDMA च्या महासंचालकांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रांतात पावसाचा जोर 9 एप्रिल 2026 पर्यंत कायम राहण्याची दाट शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर, पर्यटकांना आणि स्थानिक नागरिकांना डोंगराळ किंवा दरडी कोसळण्याची शक्यता असलेल्या संवेदनशील भागांत प्रवास न करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. प्रशासनाने नागरिकांना सरकारी निर्देशांचे काटेकोर पालन करण्याचे आणि आपत्कालीन स्थितीत तत्काळ मदत केंद्रांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number